Home Breaking News #Chandrapur • महाशिवरात्री निमित्त फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपतर्फे फळांचे वाटप

#Chandrapur • महाशिवरात्री निमित्त फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपतर्फे फळांचे वाटप

41

#Chandrapur

• महाशिवरात्री निमित्त फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपतर्फे फळांचे वाटप

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

चंद्रपूर : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त

सामाजिक बांधिलकी जपत फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपतर्फे अजयपूर मंदिरा समोर भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात ग्रुपच्या अध्यक्षा सरिता मालू तसेच मानव अधिकार एवं न्याय आयोग भारत यांच्या नॅशनल व्हाइस प्रेसिडेंट यांनी स्वतः उपस्थित राहून भाविकांना फळांचे वितरण केले.
मंदिर परिसरात मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. फळवाटपाच्या या उपक्रमामुळे भक्तांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला माया मेश्राम, स्मिता लिप,विद्या चिताडे तसेच छाया यांची विशेष उपस्थिती होती. सर्वांनी एकत्रितपणे सेवा कार्यात सहभाग नोंदवून सामाजिक एकतेचा संदेश दिला.
यावेळी सरिता मालू यांनी सांगितले की, महाशिवरात्रीसारख्या पावन दिवशी सेवा कार्य करणे हीच खरी शिवभक्ती आहे. भविष्यातही अशा सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांद्वारे समाजसेवा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सांगता समाजात बंधुता, एकोप्याची भावना आणि सेवाभाव वृद्धिंगत करण्याच्या संकल्पाने करण्यात आली.