#Gadchiroli
• महाशिवरात्री निमित्त ‘राधे राधे झांकी’ने एटापल्लीत भक्तिरसाची उधळण
• राजे अम्ब्रीशराव महाराज यांची विशेष उपस्थिती; धार्मिक परंपरा जपण्याचे आवाहन
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)


एटापल्ली : तालुक्यातील जारावंडी/कांदळी येथे शिवशक्ती शिवउत्सव समिती जारावंडी/कांदळी यांच्या सौजन्याने महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त ‘राधे राधे झांकी’ या भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरण, आकर्षक सजावट आणि जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमास अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या आगमनाने कार्यक्रमाची शोभा अधिकच खुलली. उपस्थित भाविकांना संबोधित करताना त्यांनी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक ऐक्य जपण्याचे आवाहन केले. “आपली संस्कृती हीच आपली ओळख आहे; ती जतन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमातील ‘राधे राधे झांकी’चे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण ठरले. झांकीतील देखावे, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिगीतांच्या सुरांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेत महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला.
यावेळी युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते रमेशजी बच्छाड, भाजप जिल्हा सचिव मोहन नामेवार, निरपद रॉय, संजू सेन, सपन करमरकर, सरपंच पप्पू येरमे, प्रविण मुरत्तीवार, कमल मंडळ, कमांडर मंडळ, तुषार वेल्डिंग, मोरेश्वर सिडाम, नरेश सिडाम, रोहित मडावी, चिंना पेदापल्लीवार तसेच जारावंडी/कांदळी येथील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिवशक्ती शिवउत्सव समितीचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातही अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक संदेश देण्याचा संकल्प समितीने व्यक्त केला.

