Home Breaking News #Chandrapur  • महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे चंद्रपूरात उत्स्फूर्त स्वागत

#Chandrapur  • महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे चंद्रपूरात उत्स्फूर्त स्वागत

80

#Chandrapur

• महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे चंद्रपूरात उत्स्फूर्त स्वागत

सुवर्ण भारत: किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या काल चंद्रपूर दौऱ्यावर आल्या असता त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चंद्रपूर जिल्हा विद्यार्थी नेते विशाल परब गिरटकर यांनी दुपारी स्थानिक विश्रामगृह येथे त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

या प्रसंगी महिलांच्या हक्कांसंदर्भातील विविध प्रश्नांवर तसेच जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. महिला आयोगाच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना न्याय व संरक्षण मिळावे, यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षा चाकणकर यांच्या दौऱ्यामुळे स्थानिक महिलांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या समस्यांवर प्रभावी तोडगा निघेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.