Home Breaking News आ. किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

आ. किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

123
Oplus_131072

आ. किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

सुवर्ण भारत;पंकज रामटेके सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : महाराष्ट्राचे आराध्य दैवत व ‘हिंदवी स्वराज्याचे’ संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (शिवजयंती) दि. १९ फेब्रुवारी २०२६, गुरुवार रोजी घुग्घुस येथील आ. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिमान व उत्साहाच्या वातावरणात मानाचा मुजरा करण्यात आला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस द्विपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित शिवभक्त कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिकांनी महाराजांच्या पराक्रमाला, दूरदृष्टीला व स्वराज्याच्या विचारांना त्रिवार अभिवादन केले.

“जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शिवजयंतीच्या निमित्ताने एकमेकांना हार्दिक शुभेच्छा देत समाजात ऐक्य, शौर्य व राष्ट्रप्रेमाची प्रेरणा जोपासण्याचा संकल्प करण्यात आला.

याप्रसंगी भाजपा घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, महिला शहराध्यक्ष सुचिता लुटे, गटनेत्या तथा नगरसेविका मीना मोरपका, नगरसेवक गणेश पिंपळकर, आशिष माशिरकर, इमरान खान, स्वप्नील वाढई, मुन्ना लोडे, विनोद चौधरी, मयूर कालवल, राजेश मोरपका, संतोष पाटील, राजेंद्र लुटे, रामन तांड्रा, रुपेश भटवलकर, रुपेश कोहळे, महादेव देशमाने, प्रेम गंगाधरे, राजकुमार गोडसेलवार, विकास निषाद, रोहित आसम, दयाराम सरोज, आतिश लोडे, संजय पखाले, मुलचंद सरोज, नीरज यादव, सुनीता पाटील, नीतू चौधरी, प्रेमा तग्रपवार, नितू जैस्वाल, संगीता बोबडे, रेखा रेगुंडवार, सविता आवळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालत समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.