Home Breaking News घुग्घुस शहरात शिवजयंतीनिमित्त भव्य रॅली; उबाठाच्या वतीने समाज ऐक्याचा संदेश

घुग्घुस शहरात शिवजयंतीनिमित्त भव्य रॅली; उबाठाच्या वतीने समाज ऐक्याचा संदेश

69
Oplus_131072

घुग्घुस शहरात शिवजयंतीनिमित्त भव्य रॅली; उबाठाच्या वतीने समाज ऐक्याचा संदेश

सुवर्ण भारत : पंकज रामटेके प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तिथीनुसार राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील मुख्य चौकातून ढोल-ताशा पथक आणि डीजेच्या गजरात ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संपूर्ण शहरभर रॅली काढून शिवभक्तांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. शोभायात्रेदरम्यान छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने दिलेल्या यातनांचे चित्रण करणारे छोटेखानी ‘छावा’ प्रदर्शन सादर करण्यात आले, ज्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

या रॅलीमध्ये शहरातील नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के, विवेक बोडे, रोशन पचारे, राजू रेड्डी, सुरज कन्नर तसेच गुरुदेव सेवा मंडळातील मान्यवरांसह गावातील असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या शोभायात्रेचे आयोजन शिवसेना शहरप्रमुख हेमराज बावणे, शहर संघटक अमित बोरकर आणि उपतालुकाप्रमुख योगेश भांदक्कर यांनी केले.

यावेळी उपशहर प्रमुख अनुप कोंगरे, ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ धोंगळे, वेदप्रकाश मेहता, राकेश जयस्वाल, लक्ष्मणजी बोबडे, कुलदीप इंगोले, अरविंद चिमणे तसेच महिला आघाडीच्या नैना ढोके, आनंदी कांबळे, स्नेहा पाटील यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.