Home Breaking News • “शेतकऱ्याची बायको” वेशभूषा स्पर्धेत प्रियंका नाईक प्रथम • आंतरराष्ट्रीय महिला...

• “शेतकऱ्याची बायको” वेशभूषा स्पर्धेत प्रियंका नाईक प्रथम • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बल्लारपुरात महिला सन्मान व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

131
Oplus_131072

• “शेतकऱ्याची बायको” वेशभूषा स्पर्धेत प्रियंका नाईक प्रथम

• आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बल्लारपुरात महिला सन्मान व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपुर : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नगर परिषद बल्लारपुरच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने मंगळवारी (दि. १० मार्च) सकाळी ११ वाजता राजे खांडक्या बल्लाळशाह नाट्यगृह येथे महिला सन्मान व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करून महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषद बल्लारपुरच्या अध्यक्षा अल्का अनिल वाढई होत्या, तर उद्घाटन तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी विशाल वाघ, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रजनीताई हजारे, पोलीस उपनिरीक्षक करीश्मा मोरे तसेच शिक्षण सभापती कु. प्रियंका भारत थुलकर, गोमती पाचभाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय महिला बचत गट व विविध महिला मंडळांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मनं जिंकली.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या  “शेतकऱ्याची बायको”  या वेशभूषा स्पर्धेत आदर्श महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रियंका अशोक नाईक  यांनी प्रभावी सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला. ग्रामीण जीवनातील कष्टकरी महिलांचे वास्तव त्यांनी प्रभावीपणे मांडल्याने उपस्थितांकडून त्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अॅड. मेघा भाले, उपसभापती शिल्पा चुढे तसेच सदस्य अमकुबाई भुक्या, वैशाली हुमने, सुनिता जिवतोडे, विद्या खरतड, काजल तोटावार, रजनी मुलचंदानी आणि ताजिया शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला शहरातील मोठ्या संख्येने महिला, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. शेवटी आयोजकांनी उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांचे आभार मानले.