उभ्या ट्रॅक्टर च्या ट्रॉलीला दुचाकीची जोरदार धडक
दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
चिमूर : – आज दिनांक. १८/०३/२०२६ ला सकाळी ०९:४५ वाजताच्या सुमारास चिमूर शहरातील नेहरू चौक येथील हनुमान मंदिरा लगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर नगर परिषद चिमूर येथील घणकचरा वाहतूक करणारा ट्रॅक्टर रोड दुभाजकाला लागून उभा केला असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रिपलसीट दुचाकी ने जबर धडक दिली यात घटनास्थळी एकाचा मृत्यू झाला तर दोघांना नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यातील पुन्हा एका जनाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून तिसरा इसम गंभीर असून त्यावर उपचार सुरु आहे. ट्रॅक्टर मुंडा वाहन क्रमांक – MH-40-L-5509 (महेंद्रा 595 DI सरपंच कंपणी चा मुंडा) तर ट्रॉली वाहण क्र. MH-34-BV-7365 (श्रीकृष्ण ट्रेलर कंपणीची ट्रॉली) व मोटार सायकल वाहण क्र. MH-34-AW-8587 (फॅशन प्रो कंपनी ) (1) चालक प्रथमेश मनोहर मेश्राम वय-24 वर्ष राहणार नेताजी वार्ड चिमुर (मृतक)
(2) प्रशांत अभिमन शंभरकर वय 39 वर्ष राहणार कवडशी (रोडी) ता. चिमुर (नागपुर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.)
(3) उत्तम रंगाराव रामटेके वय 50 वर्ष राहणार कवडशी (रोडी) ता. चिमुर गंभीर जखमी आहे. तर
ट्रॅक्टर चालक-उस्मान खाँ छोटु खाँ पठाण वय-60 वर्ष राहणार नेताजी वार्ड चिमुर असे असून दोन्ही वाहणाला चिमूर पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.





