Home Breaking News बामणी येथे गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आत्महत्येचे कारण अस्पष्ट; बल्लारपूर पोलिसांत...

बामणी येथे गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आत्महत्येचे कारण अस्पष्ट; बल्लारपूर पोलिसांत नोंद

53

बामणी येथे गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली

आत्महत्येचे कारण अस्पष्ट; बल्लारपूर पोलिसांत नोंद

सुवर्ण भारत : शंकर महाकाली

बल्लारपूर: बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बामणी गावात एका इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. महादेव काशीनाथ तीतरे (५१) असे मृताचे नाव असून त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
महादेव तीतरे हे बामणी येथील रहिवासी असून रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांनी अज्ञात कारणावरून गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी प्रतिसाद मिळत नसल्याने ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.
मृताला मद्याचे व्यसन असल्याची प्राथमिक चर्चा असली तरी, कौटुंबिक कलह किंवा अन्य काही कारणातून हे पाऊल उचलले का, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सपोनि श्रीनाथ गिराम व महेश कुकुडकर या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे