• विसापूरातील ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर गिरडकर यांच्या प्रकृतीची विचारपूस
• ब्रिजभूषण पाजारे यांची गृहभेट; कार्यकर्त्यांची उपस्थिती
सुवर्ण भारत : शंकर महाकाली
बल्लारपूर : विसापूर येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते भास्कर गिरडकर यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच चंद्रपूरचे माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाजारे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी गिरडकर यांच्यासोबत सुमारे एक तास संवाद साधत त्यांना धीर दिला.
भास्कर गिरडकर हे गेल्या ३५ वर्षांपासून भाजप पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्यरत आहेत. पक्षवृद्धीसाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांची दखल घेत त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानुसारच ब्रिजभूषण पाजारे यांनी कार्यकर्त्यांसह भेट देत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
या प्रसंगी चंद्रकांत देऊळकर (भाजप युवा तालुका अध्यक्ष), महेश तुरणकार, अरुण चिंचोळकर, अशोक भोयर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
—
आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा दूरध्वनीवरून संवाद
विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भास्कर गिरडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. “आपण आरोग्याची काळजी घ्या. कोणतीही अडचण असल्यास मला तत्काळ कळवा,” असे त्यांनी सांगितले.
तसेच, “कितीही अडचणी आल्या तरी आपण विसापूरचे भक्कम पाया आहात, खचून जाऊ नका,” अशा शब्दांत त्यांनी गिरडकर यांना धीर दिला.





