कामगार दिनीच कंत्राटदाराच्या वाहनाने घेतला कामगाराचा बळी
चरुरखटी येथील घटना
वृत्तपत्र प्रतिनिधी व ग्रामस्थांच्या आंदोलनापुढे ठेकेदार नरमले
मृतकाचे कुटुंबाला मिळाली आर्थिक मदतीचे आश्वासन
सुवर्ण भारत : खेमचंद नेरकर
वरोरा : महाराष्ट्र राज्यात कामगार दिनाचा सोहळा
सुरू असतानाच मात्र रोडच्या बांधकामावर काम करीत असलेल्या कामगारांवर कंत्राटदाराचे वाहनाने चिरडून जगाचा निरोप घ्यावा लागतो आहे.हे दुर्दैवी घटना आहे.भीषण अशा अपघातात नांद्रा येथील मृतक सुनील माणिक कुमरे या कामगाराचा जागीच मृत्यू झाला.सदर घटना 1 मे 2026 ला रात्रौ दरम्यान घडली.कंत्राटदारांचे हलगर्जीपणामुळे सुनील चा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी आणि काही वृत्तपत्र प्रतिनिधींनी लावला.जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृत्यू देह हलवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.अखेर प्रशासनाच्या प्रयत्नामुळे पीडित कुटुंबाला आर्थिक मदत कंत्राटदाराने जाहीर केली.
प्राप्त माहितीनुसार चरुरखटी गावाजवळील तास नाल्याजवळ रस्त्याचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे.महाराष्ट्र दिनी काम सुरू असताना कंत्राटदाराच्या मालकीचे MH 34 CO 1484 या क्रमांक चे वाहनाने मृतक सुनील माणिक कुमरे यांच्या MH 34A y 1097 या दुचाकीला जबर धडक दिली,आणि धडकेत सुनील कुमरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.सदर वरोरा ते सोईट या मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू आहे.आणि या रस्त्याने कोळशाचे लोडींग वाहतूक करणारे ट्रक ,तसेच रस्ता बांधकाम करणारे ठेकेदारांची वाहने चालतात खराब रस्ता असताना सुद्धा भरधाव वेगाने चालक आपली वाहने चालवीत असतात.त्यामुळे लोकांना बळी पडावे लागत आहे.याकडे वाहतूक नियंत्रक प्रशासन व बांधकाम विभाग यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे फलक व बरिकेट्स लावायचे सुद्धा बांधकाम विभाग विसरतात .याबाबत नागरिकांनी बांधकाम विभागाला निवेदन सादर करणार असल्याची माहिती आहे.सबंधित ठेकेदाराचे वाहनावर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा होत आहे.अपघात स्थळी पोलीस तात्काळ पोहचले.पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

