६५ नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ
प्रतिनिधि / राजेश येसेकर
भद्रावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नि

मित्ताने शिलभद्र मंडळ, गौतम नगर भद्रावतीने दि. ३० एप्रिल रोज गुरुवारला अशोका बुद्ध विहार, गौतम नगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनचे डॉ. आशीष बारबदे, डॉ.ट्विंकल ढेंगळे, सूरज साळुंके, ज्योती मुरमाळकर, वैष्णवी सहारे तसेच तालुका ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ऐश्वर्या महल्ले, नैना लोणकर, श्रुती कदम, माधुरी मत्ते, मंजुश्री मूर्ती, शुभम दुधे, शीतल भडके आणि तेजस्वी दुर्योधन यांनी मोफत आरोग्य शिबिराला सेवा दिली.
शिबिरात रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, एच.आय.व्ही. तसेच तोंडाचे कॅन्सर, स्तन कॅन्सर आणि गर्भाशयाचे कॅन्सरची तपासणी करण्यात आली. गौतम नगरातील ६५ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन च्या वतीने पुरुष तथा महिलांना कॅन्सर आजाराबद्दल माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. कॅन्सर सारखा आजार लवकर लक्षात आला आणि त्यावर त्वरित उपचार केले तर कॅन्सर आजारावर मात करता येऊ शकते. अशी अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिलभद्र मंडळाचे अध्यक्ष भारत खोब्रागडे, हरिदास जवादे, अनिल बांबोडे, प्रवीण चिमुरकर, नानाजी रामटेके, भावना खोब्रागडे, सारिका पथाडे, सागर कांबळे, हर्षल मेश्राम, संभव देशकर, सार्थक देशकर, प्रेरित लोणारे, अशित मेश्राम शाश्वत कांबळे आणि इतर सदस्यांनी अथक प्रयत्न केले.

