Home Breaking News कडक उन्हात दिलासा देणारी सावली : आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा उपक्रम

कडक उन्हात दिलासा देणारी सावली : आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा उपक्रम

89
Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072

कडक उन्हात दिलासा देणारी सावली : आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा उपक्रम

सुवर्ण भारत : शंकर महाकाली 

बल्लारपूर : प्रखर उन्हाळा आणि कडक ऊन यामुळे त्रस्त झालेल्या फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या लघु व्यावसायिकांसाठी दिलासा देणारा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः मैदानात उतरून गरजू फुटपाथधारकांपर्यंत मदत पोहोचवली, त्यामुळे त्यांच्यात नवचैतन्य आणि उत्साह निर्माण झाला आहे.

शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक फुटपाथवर छोट्या व्यवसायांद्वारे आपला उदरनिर्वाह करतात. विशेषतः रविवारी भरविण्यात येणाऱ्या भाजी मार्केटमधील विक्रेत्यांना उन्हाळा, पावसाळा आणि बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसतो. ही बाब लक्षात घेऊन, दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार मुनगंटीवार यांच्या वतीने ५ लिटर पाण्याचे जार आणि मोठ्या छत्र्यांचे वितरण करण्यात येत आहे.

दुपारी २ ते ३ वाजताच्या कडक उन्हात त्यांनी स्वतः उपस्थित राहून फुटपाथधारकांशी संवाद साधला आणि त्यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तसेच, पुढील दोन दिवसांत सर्व गरजूंना मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या उपक्रमाची जबाबदारी भाजपचे माजी अध्यक्ष काशीनाथ सिंह, सुधीरभाऊ फॅन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर आणि त्यांच्या टीमकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडून निःस्वार्थ भावनेने वेळेत मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.

आमदार मुनगंटीवार यांना आपल्या मध्ये पाहून फुटपाथधारकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत, एवढ्या व्यस्त लोकप्रतिनिधीने स्वतः येऊन समस्या जाणून घेणे आणि मदत करणे ही मोठी बाब असल्याचे सांगितले. या उपक्रमाला “समाजसेवा हीच ईश्वरसेवा” याचे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

यापूर्वीही आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, चष्मा वाटप, दिव्यांगांसाठी तीनचाकी सायकली, शिवणयंत्र वाटप यांसारखे अनेक जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात आले असून हजारो नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे.

या प्रसंगी काशीनाथ सिंह, श्रीकांत आंबेकर, समाजसेवक तसेच भाजी मार्केटचे अध्यक्ष नासिर बख्श (भुरुभाई) यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने फुटपाथधारक उपस्थित होते.

हा उपक्रम केवळ मदत पुरवणारा नसून, समाजातील दुर्बल घटकांप्रती संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरत आहे.