Home Breaking News • विसापुरात कापूस लागवडीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण • बल्लारपूर तालुका कृषी...

• विसापुरात कापूस लागवडीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण • बल्लारपूर तालुका कृषी विभागाचा उपक्रम; शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर कापूस बियाण्यांचे वितरण

82
Oplus_131072

• विसापुरात कापूस लागवडीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

• बल्लारपूर तालुका कृषी विभागाचा उपक्रम; शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर कापूस बियाण्यांचे वितरण

सुवर्ण भारत: वैभव मेश्राम
प्रतिनिधी, बल्लारपूर

विसापूर : बल्लारपूर तालुका कृषी विभागाच्या वतीने विसापूर ग्रामपंचायत येथे मंगळवारी सघन कापूस लागवडीच्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कृषी अधिकारी उद्धव डिकळे यांनी शेतकऱ्यांना कापूस लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर कापूस बियाण्यांचे वितरण करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन करताना उद्धव डिकळे यांनी शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार आधुनिक व वैज्ञानिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादन खर्च नियंत्रणात राहण्यास मदत होते, तसेच प्रति एकर उत्पादनातही वाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शेती क्षेत्रात सातत्याने बदल होत असून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे ही काळाची गरज आहे. योग्य नियोजन, सुधारित बियाण्यांचा वापर आणि आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर कापूस बियाण्यांचे वाटप करण्यात आले. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाकडून बियाणे उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमामुळे कापूस लागवडीस चालना मिळणार असून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासाही मिळणार आहे.

कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, कृषी विभागाचे कर्मचारी तसेच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.