Home Breaking News • नांदगाव (पोडे) येथे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०२ नागरिकांनी घेतला लाभ

• नांदगाव (पोडे) येथे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०२ नागरिकांनी घेतला लाभ

57
Oplus_131072

• नांदगाव (पोडे) येथे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०२ नागरिकांनी घेतला लाभ

सुवर्ण भारत: वैभव मेश्राम
बल्लारपूर, प्रतिनिधी

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वसमावेशक आरोग्य व उपचार शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ३०२ नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.

हे शिबिर वनाडोंगरी शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. शिबिरात नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसनरोग आदी विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान मोतीबिंदू व इतर नेत्रविकारांवर उपचाराची आवश्यकता असलेल्या ६० रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले. त्यांच्या प्रवासापासून उपचारांपर्यंत सर्व बाबींची योग्य काळजी घेण्यात आली.

माजी वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनानुसार रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली. नागपूर येथे दाखल झालेल्या रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या असून रुग्णांना भेडसावणाऱ्या किरकोळ अडचणीही तत्काळ डॉक्टरांच्या माध्यमातून दूर करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या आरोग्य शिबिराचे संपूर्ण नियोजन व आयोजन भारतीय जनता पार्टी बल्लारपूर तालुका अध्यक्ष चंद्रकांत देऊळकर यांनी केले.