Home Breaking News शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा जिवती येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा जिवती येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

63

शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा जिवती येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

सुवर्ण भारत:कृष्णा चव्हाण
प्रतिनिधी, जिवती

जिवती : या प्रसंगी नवप्रवेशित विद्यार्थ्यांची ढोल व बँड पथक सह गावात प्रभात फेरी काढण्यात आली तसेच पहिलीच्या विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटक अनुसया राठोड नगर अध्यक्ष, गिरीश पौळ सहाय्यक प्रकल्प अधिकारी ई मान्यवरांनी शाळेत वृक्षारोपण सुद्धा केले. तसेच इयत्ता 10 वी व बारावी परीक्षेत प्रविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅग इ. साहित्य भेट देऊन सत्कार करण्यात आले. सोबतच शाळेला जास्तीत जास्त प्रवेश मिळवून देणाऱ्या पालकांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष गिरीश पौळ सहायक प्रकल्प अधिकारी चंद्रपूर, माजी पं स सभापती भीमराव मेश्राम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाडूजी कोडापे , गावचे पोलीस पाटील किसन गेडाम,लक्ष्मी जुमनाके नगरसेवक,मारोती कुमरे, शामराव गेडाम नगरसेवक,मतीन शेख,कृष्णा चव्हाण, दौलत गेडाम दिगंबर गुडमेवाड, सुरेश कोडापे, मुख्याध्यापक उमेश राठोड, अधीक्षक निखिल कडू, अधिक्षिका शालिनी वाघमारे, शाळेचे शिक्षक वृंद, कर्मचारी, व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उच्च माध्यमिक शिक्षिका कु अर्चना जुनघरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गायकवाड यांनी केले .‌