Home Breaking News धानोरा जनता माध्यमिक /उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक/प्राचार्यपदी सय्यद ए.डी यांची तर– उपमुख्याध्यापकपदी...

धानोरा जनता माध्यमिक /उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक/प्राचार्यपदी सय्यद ए.डी यांची तर– उपमुख्याध्यापकपदी गवळी बी.आर. यांची निवड— सय्यद /गवळीसर यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव–

69
Oplus_131072

• धानोरा जनता माध्यमिक /उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक/प्राचार्यपदी सय्यद ए.डी यांची तर– उपमुख्याध्यापकपदी गवळी बी.आर. यांची निवड—

• सय्यद /गवळीसर यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव–

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
7709311525

आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता माध्यमिक / उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक /प्राचार्यपदी सय्यद ए.डी.यांची तर, उपमुख्याध्यापकपदी गवळी बी. आर. सर यांची निवड झाल्याने विद्यालयातील सर्व स्टाफ, मित्र परिवार / विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने त्यांचा शाल/श्रीफळ /पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी धानोरा येथील जीवन क्लिनिकचे डॉ. रज्जाक सय्यद, कैलास मोरे, ज्येष्ठ पत्रकार प्रा.निसार शेख, माजी सभापती अंकुशराव चव्हाण, माजी सरपंच राजाभाऊ शेळके, ह भ प परमेश्वर गायकवाड महाराज, आजिनाथ शेळके , डॉक्टर वैभव तोडकर, इर्शादभाई शेख,
संदीप झांजे ,नितीन मोरे, होळकर , गायकवाड,एस आर गव्हाणे , एस. पी .अडागळे , एकशिंगे , निजाम पठान , घोडेस्वार सिताराम आदी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त मुख्याध्यापक सय्यद / उपमुख्याध्यापक गवळी यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देत विद्यालयाची उज्ज्वल परंपरा अधिक बळकट करण्यासाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त केला .
मुख्याध्यापक सय्यद सर यांनी सत्काराबद्दल उपस्थित सर्वांचे आभार मानत शिक्षक/ पालक/विद्यार्थी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्याने विद्यालयाच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
तर उपमुख्याध्यापक गवळी यांनीही विद्यार्थीकेंद्रित शिक्षण/शैक्षणिक उपक्रम आणि गुणवत्तावृद्धीसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.
छोटेखानी कार्यक्रम आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असुन उपस्थितांनी नवनियुक्त मुख्याध्यापक / उपमुख्याध्यापक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत विद्यालय शैक्षणिक/सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात अधिक प्रगती करेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त केला.