वरोरा पोलिसांनी सोन व पैसे चोरी प्रकारणांचा 24 तासाच्या आत लावला छडा, 2 महिला आरोपी सोबत ऐवज ताब्यात
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा :वरोरा रोजी पो. स्टे. वरोरा येथे फीर्यादी कल्यानी श्रीकांत जांभुळकर राह. टाकळघाट जि. नागपुर ही रत्नमाला चौक वरोरा येथुन बसने नागपुर येथे जाण्यास निघाली असता बस स्टॉन्ड रत्नमाला चौक वरोरा येथुन बस मध्ये चढतांना दोन अज्ञात महीलांनी त्याचे पर्स मधिल 1) 20 ग्राँमची सोण्याची पोत कि.2,82,500/- रु 2) पर्स मधिल 2500/-रु असा एकुन 2,82,500/- रु चा माल हातचलाखीने चोरी करुन बसनी निघुन गेले.
अश्या फीर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पो.स्टे. ला अप क्र. 784/2026 कलम 303(2), 3 (5) भा. न्या. स.2023 प्रमाणे गुन्हा नोंद होताच पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सा.अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे सा.उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल सा., यांचे मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी ओमप्रकाश सोनटक्के सा.यांनी तात्काळ पथक तयार करुन रवाना केले असता सदर गुन्हात गुन्हातील महीला आरोपी नामे 1) नन्नु रोहीत दुनगो वय 26 वर्ष राह. नागपुर 2) उषा राजु मानकर वय 20 वर्ष राह. नागपुर यांना ताब्यात घेवुन त्याचे कडुन चोरी केलेले नमुद असलेले 1) 20 ग्राँमची सोण्याची पोत कि.2,82,500/- रु 2) पर्स मधिल 2500/-रु असा एकुन 2,82,500/- रु चा नमुद महीला आरोपी कडुन 24 तासाचे आत जप्त करुन फीर्यादीच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सा.अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल सा. प्रभारी अधिकारी ओमप्रकाश सोनटक्के सा.यांचे मार्गदर्शनात सपोनी शरद भस्मे सा., म.पोउपनी सुमीत्रा साखरकर, पो. स्टॉफ विशाल राजुरकर, सौरभ कुलते, महेश गावतुरे, सुखराज यादव, संदिप मुळे, प्रशांत नागोसे, अमोल नवघरे, मनोज ठाकरे, नेमनुक पो. स्टे. वरोरा अश्या विशेष पथकाच्या मदतीने केली आहे.







