Home Breaking News • आमदारं देवतळे यांनी शहरात तिरंगा रॅली काढून देशभक्तीच्या रंगात रंगले शेकडो...

• आमदारं देवतळे यांनी शहरात तिरंगा रॅली काढून देशभक्तीच्या रंगात रंगले शेकडो लोक • भव्य तिरंगा रॅलीसाठी विद्यार्थी,माजी सैनिक व नागरिकांची मोठी गर्दी •तिरंगा राष्ट्राचा आत्मसन्मान, एकता आणि अखंडतेचे प्रतीक आहे : आमदार करण देवताळे

3

• आमदारं देवतळे यांनी शहरात तिरंगा रॅली काढून देशभक्तीच्या रंगात रंगले शेकडो लोक

• भव्य तिरंगा रॅलीसाठी विद्यार्थी,माजी सैनिक व नागरिकांची मोठी गर्दी

• तिरंगा राष्ट्राचा आत्मसन्मान, एकता आणि अखंडतेचे प्रतीक आहे :आमदार करण देवताळे

वरोरा : देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि तिरंग्याबद्दलचा अभिमान जागृत करण्याच्या उद्देशाने आज वरोरा शहरात आमदार करण देवतळे यांनी एक भव्य तिरंगा रॅली काढली होती. तिरंगा रॅली मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेऊन आपली देशभक्ती प्रदर्शित केली.
गुरुवारी दुपारी २ वाजता आमदार करण देवतळे व माजी सैनिकांनी शहीद स्मारकाला माल्यार्पण करून रॅलीला सुरुवात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत पद्मावार चौक, नेहरू चौक, मित्र चौक, डोंगरवार चौक, वीर सावरकर चौक आणि महात्मा ज्योतिबा फुले चौकातून परत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचत तिरंगा रॅलीचे समापन झाले.
या ऐतिहासिक आणि भव्य तिरंगा रॅलीमध्ये वरोरा शहरातील अनेक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचारी, विविध सामाजिक, माजी सैनिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक आणि पर्यावरण संघटना, व्यावसायिक समुदाय, महिला, युवक, विविध सामाजिक संघटनांचे अधिकारी व कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
रॅलीला संबोधित करताना आमदार देवतळे म्हणाले की, तिरंगा हा राष्ट्राच्या आत्मसन्मान, एकता आणि अखंडतेचे प्रतीक आहे. आमदार देवताळे यांनी देशाच्या शहीद जवानांच्या सन्मानार्थ घोषणा दिल्या. येथून, शाळेतील एनसीसीचे विद्यार्थी, माजी सैनिक, प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, भाजपचे अधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक आणि शेकडो नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन आणि बँडच्या तालावर व देशभक्तीपर गीतांवर नाचत देशभक्तीपर घोषणा देत रॅलीत सहभाग घेतला. या रॅलीत शालेय विद्यार्थ्यांनी १५० फूट लांब तिरंगा हातात घेऊन ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘अमर रहे अमर रहे’, ‘देशाचे शूर शहीद जवान, अमर रहे’ अशा घोषणा दिल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मित्तलवार यांनी आपल्या पोलीस पथकासह रॅलीच्या सुरक्षेची व्यवस्था पाहिली.