Home Breaking News वरोरा पोलिसांचे सामाजिक बांधिलकी; ४१ पोलिस कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

वरोरा पोलिसांचे सामाजिक बांधिलकी; ४१ पोलिस कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

4

वरोरा पोलिसांचे सामाजिक बांधिलकी; ४१ पोलिस कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

वरोरा  : महाराष्ट्र पोलीस व चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी वरोरा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिरात ४१ रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘रक्तदान हेच जीवनदान’ असा संदेश दिला.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात जीवन ज्योती ब्लड सेंटर अँड कंपोनंट्स यांच्या माध्यमातून रक्तसंकलनाची व्यवस्था करण्यात आली होती.

गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. रक्ताचा प्रत्येक थेंब गरजू रुग्णासाठी जीवनदायी ठरू शकतो, या भावनेतून पोलिसांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

वरोरा पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांनाही रक्तदानासारख्या सामाजिक व मानवतावादी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत ४१ जणांनी रक्तदान केल्याने त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.