Home Breaking News वरोरा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आज वेशभूषा स्पर्धा व भव्य दहीहंडी...

वरोरा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आज वेशभूषा स्पर्धा व भव्य दहीहंडी उत्सव! श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वरोऱ्यात विविध उपक्रम; खासदार, आमदारांसह मान्यवरांची राहणार उपस्थिती!

10

वरोरा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आज वेशभूषा स्पर्धा व भव्य दहीहंडी उत्सव!

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वरोऱ्यात विविध उपक्रम; खासदार, आमदारांसह मान्यवरांची राहणार उपस्थिती!

वरोरा तालुका प्रतिनिधी

सकल हिंदू समाज, वरोरा यांच्या वतीने श्री कृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सवाचे औचित्य साधून आज वरोरा शहरात भव्य ‘वेशभूषा स्पर्धा’ आणि ‘दहीहंडी उत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. आमदार श्री. करणभाऊ देवतळे यांच्या विशेष सहकार्याने हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्याला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. करणभाऊ देवतळे, वरोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. अर्चनाताई ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदांतीताई देवतळे आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. आशिषभाऊ ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
भव्य वेशभूषा स्पर्धा:
आज रोजी दुपारी ०१:०० ते ०४:०० या वेळेत ‘श्री. दादासाहेब देवतळे शेतकरी भवन, वरोरा’ येथे बालकांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
* गट १ (वय १ ते ६ वर्षे): प्रथम बक्षीस – सायकल, द्वितीय बक्षीस – सायकल (Kids), तृतीय बक्षीस – स्टडी टेबल.
* गट २ (वय ६ ते १२ वर्षे): प्रथम बक्षीस – सायकल, द्वितीय बक्षीस – सायकल (Kids), तृतीय बक्षीस – स्टडी टेबल.
अधिक माहिती व नोंदणीसाठी ७८८८००२७२५ किंवा ८४५९५८४८६८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
भव्य दहीहंडी उत्सव २०२६:
आज सायंकाळी ०६:०० ते १०:०० या वेळेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वरोरा’ येथे भव्य दहीहंडी उत्सवाचा थरार रंगणार आहे.
या दोन्ही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना वरोरा शहर व परिसरातील नागरिकांनी, बालगोपालांनी तसेच दहीहंडी पथकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज, वरोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.