Home Breaking News वरोऱ्यात शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश; शेकडो शिवसैनिक व महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश जिल्हा...

वरोऱ्यात शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश; शेकडो शिवसैनिक व महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश जिल्हा संपर्कप्रमुख प्रवीणदादा कदम यांच्या उपस्थितीत आशिष रणदिवे व त्यांच्या सहकाऱ्याचा पक्षप्रवेश.

10

वरोऱ्यात शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश; शेकडो शिवसैनिक व महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश

जिल्हा संपर्कप्रमुख प्रवीणदादा कदम यांच्या उपस्थितीत आशिष रणदिवे व त्यांच्या सहकाऱ्याचा पक्षप्रवेश.

वरोरा, दि. २ सप्टेंबर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वरोरा येथे बुधवारी भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला. जनाराम भवन, बोर्डा येथे आयोजित या कार्यक्रमात तालुक्यातील शेकडो शिवसैनिकांसह महिला शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे वरोरा तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याची चर्चा आहे.

 

शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रवीण दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसैनिक आशिष संजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

 

या पक्षप्रवेश कार्यक्रमात आशिष रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो शिवसैनिक व महिला शिवसैनिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश घेतला. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे उपस्थित मान्यवरांनी पक्षात स्वागत करून त्यांना पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी वरोरा तालुक्यात शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगितले. नव्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होणार असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.