ज्ञानदान हेच खरे राष्ट्रनिर्माण – घुग्घुसमध्ये शिक्षक दिनानिमित्त डॉ. राधाकृष्णन यांच्या विचारांना उजाळा
घुग्घुस : भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्त्वज्ञ, आदर्श शिक्षक आणि भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त घुग्घुस येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
आ. किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाही, तर तो भावी पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो. ज्ञानदान हेच खरे राष्ट्रनिर्माण असून, विद्यार्थ्यांनी डॉ. राधाकृष्णन यांचे विचार आत्मसात करून आपले उज्ज्वल भविष्य घडवावे.
आ. किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार आयोजित या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, महिला शहर अध्यक्षा सुचिता लुटे, गटनेत्या व नगरसेविका मीना मोरपका, नगरसेवक गणेश पिंपळकर, सुनीता पाटील, ज्येष्ठ भाजप नेते रामपाल वर्मा, शिवसाजन गोहणे, संजय भोंगळे, राजेंद्र लुटे, गणेश शेंडे, मुन्ना लोढे, महेंद्र बाग, गजानन उलमाले, सूचित सौदारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.







