इंग्रजाच्या काळापासून सोईट येथे कोहपरे परिवाराच्या
घरी होतेय जेष्ठा गौरीची घटस्थापना
वरोरा : वरोरा तालुक्यातील सोईट येथील स्व. मारोतराव कोहपरे यांचे घरी चवथ्या पिढीने महालक्ष्मीची घटस्थापना करून पारंपरिक आणि मौखिक इतिहासानुसार परंपरेच्या काळानुसार १०० वर्षाहून अधिक प्राचीन असे मानले जाते.किमान तीन ते चार पिढ्यांपेक्षा अधिक महालक्ष्मी घटस्थापनेची परंपरा जुनी आहे. इंग्रजाच्या काळापासून सुरु असलेली परंपरा सुरु ठेवली आहे. स्व. नारायण कोहपरे यांनी मुलगा स्व .संभाजी यांच्यासाठी नवस बोलले आणि तेव्हा पासून अखंड सुरु झालेल्या या महालक्ष्मी च्या व्रत घटस्थापनेला सुरुवात झाली ती अजुनही सुरु आहे. पूढे संभाजीने घटस्थापना केली नसल्याने मारोतरावचे वडील लक्ष्मण यांनी महालक्ष्मीची घटस्थापनेला सुरुवात केली. लक्ष्मण यांच्या नंतर त्यांचा मुलगा स्व.मारोतराव कोहपरे यांनी सुरुवात केली. मारोतरावचे निधनानंतर त्यांची मुले प्रमोद, पद्माकर, प्रदीप,आणि प्रल्हाद कोहपरे या चौथ्या पिढीतील
चारही बंधूनी श्री महालक्ष्मी व्रत पाळून घटस्थापनेची परंपरा सुरुच ठेवली आहे. या महालक्ष्मी देवीचे पितळी मुखवटे हे इंग्रज काळातील पहिल्या पिढी पासुन नारायण कोहपरे यांनी तिथक्षेत्र पंढरपूर येथून ३०० रुपयात विकत आणले होते.तालुक्यात पितळी मुखवटे असलेल्या श्री. महालक्ष्मीची बंगाईवर उभ्या स्थितीमध्ये घटस्थापना केली जातात.
जातात. रोषणाईचा झगमगाट,पूजा, अर्चा, भजन, पुजन, आरती, प्रसाद, तथा महाप्रसाद, नियमित पणे सुरु आहे. सर्वांना मोहून टाकणाऱ्या या महालक्ष्मी म्हणून सोईट गावात एक आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे. मराठी महिला या शुभदिनी व्रत करतात आणि देवी गौरीची पूजा करतात. व्रत अनुराधा नक्षत्र मध्ये १० सप्टेंबरला सुरवात होतात. जेष्ठ गौरी आवाहन हिंदू धर्मात खूप मोठे धार्मिक महत्व आहे. आपल्याकडे गौरी आवाहन पूजन आणि गौरीसह गणपती विसर्जनाची मोठी परंपरा आहे. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाप्रमाणे आवाहन करून महालक्ष्मीच्या प्रतिमा व प्रतिके बसवितात. जेष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महा नैवैद्य दाखवितात. तिसर्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात, गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची जेष्ठ नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला जेष्ठ गौरी असे म्हणतात. आपल्याकडील संस्कृती परंपरेत गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. गौरी महालक्ष्मी किंवा सखी पार्वतीसह त्यांची मुले ही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडली जातात. सोन्याच्या पावलांनी येऊन समृद्धी, ऐश्वर्य, वैभव प्रदान करणार्या गौरीचे आवाहन, पूजन आणि विसर्जनाची मोठी परंपरा आहे.







