Home Breaking News वरोरा येथे तान्हा पोळ्यानिमित्त बाल गोपालाकडून नंदीबैलाचे आकर्षक प्रदर्शन, जय...

वरोरा येथे तान्हा पोळ्यानिमित्त बाल गोपालाकडून नंदीबैलाचे आकर्षक प्रदर्शन, जय बजरंग तान्हापोळा उत्सव समितीकडून शैक्षणिक साहित्य कीट व बक्षीसांचे वाटप.

2
Oplus_131072

वरोरा येथे तान्हा पोळ्यानिमित्त बाल गोपालाकडून नंदीबैलाचे आकर्षक प्रदर्शन,

जय बजरंग तान्हापोळा उत्सव समितीकडून शैक्षणिक साहित्य कीट व बक्षीसांचे वाटप.

वरोरा तालुका प्रतिनिधी
वरोरा येथे तान्हा पोळ्याच्या पावन पर्वा निमित्त जय बजरंग तान्हा पोळा उत्सव समिती कडून नंदीबैल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात बालगोपालासाठी विशेष शैक्षणिक साहित्य व बक्षीस वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमात बालगोपालांना पारंपारिक संस्कृती व त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून प्रथम ९६० बालगोपालांना टोकन देऊन सोबतच शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले त्यामुळे बालगोपालामध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते व त्यानंतर ईश्वर चिट्ठीने टोकन काढून ७ (सात ) बालगोपालांना बक्षीस जाहीर करण्यात आले या बक्षीसामध्ये स्कूल बॅग व सायकल चे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी आमदार करण देवतळे, नगराध्यक्ष अर्चनाताई ठाकरे ,माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, नगरसेवक गजानन मेश्राम, मुकेश जीवतोडे यांची उपस्थिती होती आणि यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
तान्हा पोळ्याच्या निमित्ताने पारंपरिक संस्कृती सोबत बालकांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या दृष्टीने हा सुंदर उपक्रम ठरला.
“बालगोपाल यांचा उत्साह वाढवूया शिक्षणाची साथ देऊया” या भावनेतून राबविण्यात आलेल्या हा उपक्रम असाच चालत राहावा अशी भावना आमदार करण देवतळे यांनी व्यक्त केली.
हा उपक्रम जय बजरंग तान्हा पोळा उत्सव समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र राजनहिरे सचिव ज्ञानेश्वर कायरकर व सर्व समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम शांततेत पार पाडला.