Home Breaking News कर्तव्याला सलाम ! केंद्रीय ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ विजेते SDPO सत्यजित आमले...

कर्तव्याला सलाम ! केंद्रीय ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ विजेते SDPO सत्यजित आमले यांचा पत्रकार संघाकडून शाही सत्कार, मूल नगरीत गौरव सोहळा ! न्यायप्रिय आणि शिस्तप्रिय अधिकाऱ्याच्या सन्मानाने पत्रकारिता आणि पोलीस दलातील ऋणानुबंध अधिक दृढ

4

कर्तव्याला सलाम ! केंद्रीय ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ विजेते SDPO सत्यजित आमले यांचा पत्रकार संघाकडून शाही सत्कार, मूल नगरीत गौरव सोहळा !

न्यायप्रिय आणि शिस्तप्रिय अधिकाऱ्याच्या सन्मानाने पत्रकारिता आणि पोलीस दलातील ऋणानुबंध अधिक दृढ

चंद्रपूर : पोलीस दलात प्रामाणिकपणा, शिस्त आणि जनसेवेचा आदर्श निर्माण करणारे मूल, सावली, पोंभूर्णा व गोंडपिपरी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या कार्याचा गौरव अखेर सर्वोच्च स्तरावर झाला आहे. त्यांना नुकतेच पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते *केंद्रीय “अति उत्कृष्ट सेवा पदक”* देऊन गौरविण्यात आले. या ऐतिहासिक सन्मानानंतर त्यांचा पहिला जाहीर सत्कार करण्याचा मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा चंद्रपूर यांनी पटकावला.

उपविभागीय पोलीस कार्यालय, मूल येथे झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (निवड समिती) यांच्या उपस्थितीत आमले साहेबांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

गत वर्षभरापासून मूल उपविभागात कार्यरत असलेले सत्यजित आमले हे केवळ नावापुरते अधिकारी नाहीत. न्यायप्रिय, शिस्तप्रिय आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वसामान्यांच्या मनातले अधिकारी बनले आहेत. मुंबई, नाशिक, गडचिरोली सारख्या आव्हानात्मक जिल्ह्यात त्यांनी आपल्या उत्कृष्ट सेवेचा ठसा उमटवला आहे.

या गौरव सोहळ्याला प्रदेश उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे, विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप रामटेके यांच्यासह जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष राहुल थोरात, जिल्हा सरचिटणीस केवलसिंग जुनी, चंद्रपूर जिल्हा संघटक तथा सिंदेवाही तालुका अध्यक्ष वहाबअली सय्यद यांच्यासह मूल, राजुरा, भद्रावती, सिंदेवाही, नागभीड, तळोधी, चिमूर तालुकाध्यक्ष व असंख्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना आमले साहेबांनी हा सन्मान आपला नसून संपूर्ण पोलीस दलाचा आणि जनतेच्या विश्वासाचा असल्याचे सांगितले.

यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी, “जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आमले साहेबांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या सेवाभावी कार्याला आमचा सलाम आहे,” असे गौरवोद्गार काढले.

या सत्कार सोहळ्याचे मूल परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी देखील मनापासून स्वागत केले असून सर्व स्तरातून आमले साहेबांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.