Home Breaking News राखीच्या धाग्याने जुळले कामगार एकतेचे नाते; घुग्घुसमध्ये HMS युनियनचा भव्य कामगार संवाद...

राखीच्या धाग्याने जुळले कामगार एकतेचे नाते; घुग्घुसमध्ये HMS युनियनचा भव्य कामगार संवाद घुग्घुस : वेकोलीच्या वणी क्षेत्रात HMS महिला विंगचा स्तुत्य उपक्रम, राखीच्या माध्यमातून दिला कामगार एकतेचा संदेश

2

राखीच्या धाग्याने जुळले कामगार एकतेचे नाते; घुग्घुसमध्ये HMS युनियनचा भव्य कामगार संवाद

घुग्घुस : वेकोलीच्या वणी क्षेत्रात HMS महिला विंगचा स्तुत्य उपक्रम, राखीच्या माध्यमातून दिला कामगार एकतेचा संदेश

घुग्घुस : वेकोलीच्या वणी क्षेत्रांतर्गत घुग्घुस येथील टेम्पो क्लबमध्ये रविवारी एक आगळावेगळा आणि भावनिक सोहळा पाहायला मिळाला. HMS युनियन परिवाराच्या वतीने घुग्घुस उपक्षेत्र तसेच क्षेत्रीय मुख्यालय ताडाळी आणि वणी क्षेत्राच्या संयुक्त विद्यमाने कामगार संवाद व भव्य रक्षाबंधन कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून HMS युनियनचे केंद्रीय उपाध्यक्ष, केंद्रीय कंत्राटी कामगार मंडळाचे सदस्य, जेबीसीसीआय सदस्य तसेच वेकोली HMS युनियनचे अध्यक्ष शिवकुमार यादव उपस्थित होते. महिला भगिनींनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी शिवकुमार यादव यांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळ्याची भावपूर्ण सुरुवात केली. यावेळी संपूर्ण सभागृहात आपुलकी आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर वेकोली HMS युनियनचे महामंत्री शरद दांडे, वेकोली सुरक्षा मंडळाचे सदस्य संजय खाडे, शंकर खत्री, वणी क्षेत्र अध्यक्ष दीपक जायसवाल, महामंत्री जिया खान, कल्याण समिती सदस्य भारत जीवने तसेच जेसीसी सदस्य देशमाने यांच्यासह युनियनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

*महिलांच्या सन्मानाला कधीही तडा जाऊ देणार नाही – शिवकुमार यादव*

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रमुख अतिथी शिवकुमार यादव भावुक झाले. ते म्हणाले, “आपण सर्व भगिनींनी मला राखी बांधून जो सन्मान आणि आपुलकी दिली आहे, त्यासाठी मी सदैव आपला ऋणी राहीन. आपल्या या विश्वासाला आणि सन्मानाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. हा फक्त धागा नाही, तर आमच्या कामगार एकजुटीचे आणि जबाबदारीचे प्रतीक आहे.”

पुढे ते म्हणाले की, युनियनच्या बळकटीसाठी महिलांचा सक्रिय सहभाग अत्यंत गरजेचा आहे. महिलांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन युनियनच्या कार्यात सहभागी व्हावे, जेणेकरून संघटना अधिक मजबूत होईल आणि प्रत्येक क्षेत्रातील कामगारांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवता येतील. त्यांनी कामगारांशी सातत्याने संवाद ठेवण्यावर भर दिला.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन साक्षी चालकुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन साक्षी बुद्धारती यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वणी क्षेत्र महिला विंगच्या अध्यक्षा सुषमा खाडे, महामंत्री ईश्वरी केडाम, जेसीसी सदस्य जुबेर अहमद, कल्याण समिती सदस्य दत्तात्रेय डब्बावार, इम्तियाज रजाक, घुग्घुस उपक्षेत्र अध्यक्ष नंदकिशोर पाटील, मंगेश भोयर, भारत तोंबरे, मकोडे, समीर शेख, मंगला बोबडे, वर्षा हिरादेवे यांच्यासह HMS युनियनचे सर्व पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.