त्र्यंबकेश्वरहून विष्णू गिरी महाराजांचे वरोरात आगमन; भव्य मिरवणूक आणि गुरु पूजनाने पावन होणार वरोरा नगरी!
वरोरा :- त्र्यंबकेश्वर येथील जुन्या आखाड्याचे विष्णू गिरी महाराज आज दिनांक 19 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी वरोरा येथे दाखल होत असून, त्यांच्या आगमनामुळे संपूर्ण वरोरा नगरीत अभूतपूर्व भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. या निमित्ताने गुरु पूजन व भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आनंदवन चौकातून निघणार भव्य मिरवणूक मिळालेल्या माहितीनुसार, संजय नामदेव रणदिवे यांच्या घरी हा विशेष कार्यक्रम संपन्न होत आहे. दुपारी त्र्यंबकेश्वर जुना आखाडा, नाशिक येथून विष्णू गिरी महाराज वरोरा येथे गुरु पूजन व आशीर्वादाच्या कार्यक्रमाकरिता येणार आहेत. महाराजांच्या स्वागतासाठी वरोरावासी सज्ज झाले असून, सायंकाळी 5 वाजता आनंदवन चौक येथून एका अत्यंत उत्साहात आणि वाजत-गाजत भव्य मिरवणुकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होत सायंकाळी 7 वाजता कश्यप प्लाझा येथे पोहोचेल.
भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन संत-महात्म्यांच्या सानिध्यात पार पडणाऱ्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीत तल्लीन होणार आहे. धर्मप्रेमी आणि आस्तिक नागरिकांसाठी हा एक सुवर्णयोग असून, या आनंदसोहळ्यात व गुरुदर्शनाचा लाभ घेण्यासाठी समस्त भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती आशिष संजय रणदिवे व समस्त रणदिवे परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.







