Home Breaking News नवीन दहेली येथे नवयुवक पंचशील बौद्ध मंडळातर्फे सामूहिक संविधान वाचन

नवीन दहेली येथे नवयुवक पंचशील बौद्ध मंडळातर्फे सामूहिक संविधान वाचन

25

नवीन दहेली येथे नवयुवक पंचशील बौद्ध मंडळातर्फे सामूहिक संविधान वाचन

नवीन दहेली (लावारी) : भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानातील मूल्ये आणि लोकशाहीची जाणीव समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने नवयुवक पंचशील बौद्ध मंडळ, नवीन दहेली (लावारी) यांच्या वतीने सामूहिक संविधान वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात समस्त गावकरी, विहारातील पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवीन दहेली येथील सर्व विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे भारतीय संविधानाचे वाचन करून संविधानाप्रती आदर व्यक्त केला.

भारतीय संविधानाने दिलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये आपल्या जीवनात रुजविणे तसेच नवीन पिढीमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या सामूहिक संविधान वाचनामुळे गावामध्ये संविधानिक विचारांचा जागर आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.