द रिपब्लिक न्यूज नेटवर्क
शेगाव : शहरात कोरोनाचा धोका वाढत असून दररोज नवनवीन रुग्ण आढळून येत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी तीन दिवस जनता कर्फ्यु पाळावा असे आवाहन सर्व पक्षीयांनी शेगावकरांना केले आहे.
इतर शहरांप्रमाणे शेगाव कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गत काही दिवसापासून शहरात दररोज कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढत आहे. वेळीच प्रतिबंध न केल्यास परिस्थिती हाता बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे अत्यावश्यक झाले आहे. तरी शहरातील सर्व व्यापारी, व्यवसायिक, तसेच नागरीकांनी सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस स्वयंस्पुर्तीने जनता कर्फ्यु पाळावा असे सर्व पक्षीयांनी केले आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच काही विहित काळासाठी सुरु राहतील अशी देखील माहिती आहे.
