Home राज्य कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना माजी आमदार सानंदा यांचे असे भावनिक आवाहन

कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना माजी आमदार सानंदा यांचे असे भावनिक आवाहन

671

खामगाव:  कोरोना रुग्णांचा आकड़ा हा झपाट्याने वाढत आहे, एका बाजूला कोरोना रुग्णांच्या  संख्येत वेगाने वाढ होत असताना दुसऱ्या बाजूने रुग्ण बरे होण्याच प्रमाणदेखील वाढत आहे. ज्या रुग्णांना जास्त  ऑक्सीजनची गरज होती अशांवर प्लाझ्मा  थेरपीने राज्यात अनेक रुग्ण पूर्णपणे बरे  होऊन घरी  गेले आहेत.एकदा प्लाझ्मा  दानाने दोन गंभीर कोरोनाचे रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. मध्यम आणि तीव्र रुग्णांकरिता प्लाझ्मा थेरेपी हे वरदान ठरत असून प्लाझ्मा दान करणारे हे देवदूत ठरत आहेत,  म्हणून कोरोनातून बरे  झालेल्या रुग्णांनी देवदूत बनून  प्लाझ्मा  दान  करण्यासाठी स्वताहून पुढे  यावे असे  आवाहन माजी  आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले  आहे.

याबाबत सानंदांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे कि, देशातील विविध रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन सरकारमार्फत केलं जात आहे.

रुग्णसेवा करा दोन हजार मिळवा

याच दरम्यान रुग्णसेवा करा आणि 2000 रूपये  मिळवा अशी नवी  योजना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुरु केली आहे.  प्लाझ्मा थेरपी ही कोरोनाग्रस्तांसाठी अनेक ठिकाणी फायदेशीर ठरत आहे. सरकारने प्लाझ्मा दान करणाऱ्यांना बक्षीस म्हणून 2000 रूपये देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्लाझ्मा दात्याला सरकार  २००० रूपये देत  आहे याची  माहितीही नागरिकांना मोठ्या प्रमाणात होने गरजेचे आहे  त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक जण पुढाकार घेतील.

एक दाता वाचवू शकतो दोन जीव

कोरोनाची तपासणी पॉजिटिव आल्यापासून २८ दिवसांच्या अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्लाझमा दान करता येतो. ऐका वेळेस ४००.५०० मिली प्लाझ्मा येते. साधारण १५ दिवसांच्या अंतराने २.३ वेळेस प्लाझ्मा दान देता  येते.   प्लाझ्मा दान   केल्याने कोणताही त्रास होत  नाही सध्या  कोविड .19 विरोधक प्लाझ्मा बैग्ज़चा तुटवडा भासत आहे. प्लाझ्मा दानासाठी कोरोनामुक्त झालेल्यांनी समोर येणे  गरजेचे  आहे. त्याकरीता कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी देवदूत बनून प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा  आणि इतरांनाही पुढे आणावे  असं आवाहन आवाहन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.