Home राजकारण खामगाव तालुका भाजपात असे झाले फेरबदल?

खामगाव तालुका भाजपात असे झाले फेरबदल?

1159

वाचा, आमदार फुंडकर यांनी दिली कुणाला काय जबाबदारी?

खामगाव-भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार अँड. आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ यांनी भारतीय जनता पार्टीची खामगाव तालुक्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. यात विविध आघाड्या, सेल, प्रकोष्ठ यांचे पदाधिकारी निवडण्यात आले आहेत. संघटनात्मक दृष्टिकोनातून ही कार्यकारिणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

संघटनात्मक बांधणीकडे विशेष लक्ष
भारतीय जनता पक्षाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एडवोकेट आमदार आकाश फुंडकर यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे जिल्हाभर नव्या दमाची टीम जोडत असताना होम पेज खामगावकर सुद्धा त्यांचे संघटनात्मक काम पाहायला मिळत आहे नुकतीच भारतीय जनता पार्टीची खामगाव तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून ही कार्यकारिणी जाहीर करताना महत्त्वाच्या व्यक्तीची नेमणूक करण्यासोबतच सोशल इंजिनिअरिंग चे सुद्धा लक्ष ठेवण्यात आले आहे त्यामुळे आगामी काळात ही कार्यकारणी संघटना बांधण्यासाठी फायद्याची ठरेल.

कुणाला मिळाली काय जबाबदारी?

खामगाव भाजपा तालुका कार्यकारिणी गठित करताना जुन्या सोबत नवीन चेहर्‍यांना सुद्धा संधी देण्यात आली आहे .यामध्ये तालुका अध्यक्ष सुरेश गव्हाळ, संघटन सरचिटणीस, शांताराम बोधे, सरचिटणीस विलास काळे, डॉ गोपाळ गव्हाळे, विठ्ठल पेसोडे, उपाध्यक्ष वर्षाताई उंबरकार, रातनसिंग बोराडे, विलासराव देशमुख, समाधान मुंढे, मुरलीधर दळी, छगन राठोड, सदाशिव राऊत, वसंतराव वानखडे, गजानन मोरखडे, रामेश्वर सोनोने, सचिव गणेश बोचरे, सुदमसिंग इंगळे, संतोष घोराडे, हरीसिंग साबळे, गजानन गाळे, आताउल्ला खान, दिलीप उमाळे, रमेश निंबाळकर, गजानन महाले, गोपाल फुंडकर, विनोद वारूळकार, गजानन कळसकार,विठ्ठल मुजुमले, विष्णू भोपळे, कोषाध्यक्ष भागवत ठाकरे, प्रसिध्दप्रमुख किशोर होगे, यांची नियुक्ती करण्यात आली तर भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी रुपेश खेकडे, महिला आघाडी ऊर्मिलाताई शरदचंद्र गायकी, किसान आघाडी संजय ठोंबरे, विध्यार्थी सेल राज दिलीप पाटील, प्रज्ञावंत धंनजय महाले, भटक्या जाती सेल श्रीराम राठोड, वैद्यकीय आघाडी अरुण कडाळे, पंचायत राज प्रमोद कस्तुरे, अल्पसंख्याक आघाडी आबीदखान जियाउल्लाखान, सहकार आघाडी शंकर लोखंडकार, ओबीसी आघाडी रामकृष्ण भरसाखळे, सांस्कृतिक महादेव गावंडे, सैनिक आघाडी कैलास निमकर्डे, व्यापार आघाडी सुरेश पुरेहीत, अनुसूचित जाती आघाडी राजेश तेलंग, अपंग आघाडी किशोर मावकर, मच्छीमार आघाडी देविदास म्हात्रे, शिक्षक आघाडी गणेश दांदडे, कामगार आघाडी प्रकाश सरोदे, कायदा सेल संजय बडगुजर, जेष्ठ नागरिक सेल समाधान सावळे, उद्योग आघाडी गोपाळसिंग चव्हाण, अनु जाती आघाडी भगवानसिंग सोळंके, सोशल मीडिया सेल दत्ता जवळकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कार्यकारिणी सदस्य म्हणून देवानंद इंगळे, सतीश बोचरे, दशरात वानखडे, कैलास कवडकार ,सुनील वाडे, उमेश ढोण, सुनील वावगे, खेमा भगतपुरे, अनिल देशमुख, वासुदेव लांडे, संदीप जोशी, सहदेव उन्होने, कैलास बगाडे, गोपालसिंग बोराडे, संतोष हागारे, प्रकाश टेरे , रंगनाथ देशमुख, संतोष वाघ, अशोक चव्हाण गजानन भोबडे, भास्कर बुले, नामदेव भामुद्रे, प्रमोद कर्डेल, मोरेश्वर शिंदे, प्रदीप हरमकार, महादेव वाळके, पंकज गायगोळ, गोपाल महारखेडे, दीपक दांदडे ,रमेश डचंगे, रामनाथ खसावत, विठ्ठल कठकवाळ, मुरलीधर राहणे, गजानन देवाचे, समाधान मांगटे, शामसुंदर तितरे, मधुकर बारंगळे, बाळू शिंदे, रामदास राठोड, दुर्योधन कंडेलकर, पांडुरंग गायकवाड, यांचा समावेश आहे. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख किशोर होगे यांनी दिली.

भारतीय जनता पार्टी खामगाव तालुक्याची जम्बो कार्यकारणी तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ यांनी गठीत केली आहे या कार्यकारिणीत समाविष्ट झालेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो .सोबतच पक्षाचे विचार व कार्य मतदारसंघातील घराघरात  पोहचवावे ,अशी अपेक्षा व्यक्त करतो.
-ॲड. आ. आकाश फुंडकर
जिल्हाध्यक्ष भाजपा बुलढाणा