युवा चेहऱ्यावर मोठी जबाबदारी
खामगाव: राष्ट्रीय फुले ब्रिगेडच्या राज्य संघटनमंत्रीपदी रविकांत माहुलीकर यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय फुले ब्रिगेड चे राष्ट्रीय संयोजक मा. चंद्र प्रकाश सैनी यांनी खामगाव तालुक्यातील वाडीमधील लक्ष्मी नगर भागातील रहिवासी रविकांत माहुलीकर यांची राष्ट्रीय फुले ब्रिगेड च्या राज्य संगठन मंत्री म्हणुन नुकतीच नियुक्ति केली असून, राष्ट्रीय फुले ब्रिगेड माध्यमातून,सामाजिक कार्य जबाबदारीने पार पडतील अशी आशा व्यक्त करून,सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. रविकांत माहुलीकर सामाजिक कार्यात सक्रिय असतात समाजसेवा पत्रकारिता या क्षेत्रातही त्यांनी चांगले काम केले असून आता राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी या निमित्ताने त्यांना प्राप्त झाली आहे.
