Home Breaking News ‘या’ तालुक्यातील 5 ते 8 च्या 95 शाळांची वाजणार 27 जानेवारी ला...

‘या’ तालुक्यातील 5 ते 8 च्या 95 शाळांची वाजणार 27 जानेवारी ला घंटा

176

मास्क, सॅनिटायजर, आवश्यक
शाळेत जेवणास मनाई
शाळेत पाठविण्याबाबत पालकाचे संमतीपत्र बंधनकारक
शेगांव : गत 10 महिन्यापासून कोरोना विषाणू मूळे जनजीवन विस्कळीत झाले आहे विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून केंद्र सरकारने मार्च महिन्यात ताळेबंदी केली त्यामुळे सर्व देश थांबला शाळा सुद्धा बंद झाल्या प्रार्थमिक वर्गांच्या परीक्षा झाल्या नाहीत यावर्षीच्या शैक्षणिक सत्र सुरू झाले ते ऑनलाइन त्यामुळे मुलांनी 11 महिन्या पासून शाळेचा दरवाजा ओलांडला नाही काही दिवसांपूर्वी शासनाने 9ते 12 वीचे वर्ग सुरू केले तर 18 जानेवारी ला शासन निर्णय घेऊन कोविड 19 च्या केंद्र तसेच राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करीत 27 जानेवारी पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागत लगबग सुरू झाली आहे
शेगांव तालुक्यात ऐकून144 शाळा असून त्यातील जिप च्या 76, नप च्या 14 तर 54 इतर व्यस्थापणाच्या आहेत त्यातील 9 ते 12 च्या शाळा अगोदर सुरू झाल्या असून 27 जानेवारीला 5 वी ते 8 वी च्या 95 शाळांची 11402 विद्यार्थ्यांसाठी घंटा वाजणार आहेत त्यातील जिप च्या50 नप च्या 7 तर इतर व्यवशपणाच्या 38 शाळांचा समावेश असणार आहे
तालुक्यात 1037 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी असून सर्वांची ऑक्टोबर महिन्यात कोरोना चाचणी करण्यात आली होती त्यात 9 वी ते 12वी चे 273 शिक्षक, 218 शिक्षकेत्तर कर्मचारी आणी 649 प्राथमिक शिक्षक होते त्यातील 9 वी ते 12वी चे वर्ग सुरू झाले आहेत तर आता 3 महिन्यांनी परत 649 शिक्षकांना 22 जानेवारीला कोरोना चाचणी करून 11402 विद्यार्थाना शिकवण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे
शिक्षण विभागाने 27 जानेवारीला सुरू होणाऱ्या सर्व शाळांना वर्ग निर्जंतुक करून, सादिल फंडातून थर्मल गन, ऑक्सिमिटर , मास्क खरेदी करण्याचा सूचना दिल्या आहेत दररोज विद्यार्थी व शिक्षकांची ताप व ऑक्सिजन तपासून त्याच्या नोंदी ठेवाव्या लागणार आहेत, मुलांना हात धुण्यासाठी साबण , सॅनिटायजर पाणी उपलब्ध करावे लागणार आहे, 2 विद्यार्थ्यांमध्ये 6 फूट अंतर ठेवणे, मुले शाळेत जेवणार नाहीत वही , पेन, मास्क,पाणी बॉटल इतरांना देणार नाहीत तोंडात , नाकात, डोळ्यात बोट घालणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे
कोविड बाबत च्या शासन निर्णयाचे तंतोतंत पालन करून शाळा 3ते 4 तास भरेल पालकाचे पाल्यास शाळेत पाठविण्याबाबत संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे तसेच शाळेत गणित विज्ञान इंग्रजी या विषयावर भर द्यावा लागणार आहे हे विशेष.

( साभार : धनराज ससाने)