Home Breaking News दिंडि मार्गाचे काम अर्धवट टाकुन ठेकेदार गायब?

दिंडि मार्गाचे काम अर्धवट टाकुन ठेकेदार गायब?

79

शेगाव : संत नगरी शेगांव श्रीक्षेत्र नागझरी अकोला या दिंडि मार्गाचे काम अर्धवट टाकुन ठेकेदार गायब झाला आहे
संत गजानन महाराजांची दरवर्षि पाई दिंडि संत गजाननाची पालखि घेउन संत नगरी शेगांव श्रीक्षेत्र नागझरी औश्वण्शिक विद्युत केन्द्र पारस तेल डेपो गायगांव मार्गाने महानगर अकोल्या वरुन श्रीक्षेत्र पंढरपुरला जात असते हा मार्ग दिंडि मार्ग म्हणुन विकसीत व्हावा असा द्रुष्टिकोन समोर ठेवुन गेली अनेक वर्ष मागणी होत आहे त्याची दखल घेऊन मागच्या वर्षी या मार्गाच्या विकासाचे काम सुरु झाले दोन महिने काम होऊन बंद पडले परत यावर्षि हे काम सुरू झाले शेगांव नागझरी पारस निमकर्दा गायगांव अकोला असे काम सुरू केले रस्ते खोदले नाल्या पुल खोदले परंतु दोन महिन्यात हे काम बंद पडले परत काही दिवस काम सुरू झाले परत चांगले डांबरी रस्ते खोदले नागमोडी नाल्या केल्या चांगले पुल खोदुन रसत्याच्या बाजुने खड्डयातुन कच्चे अत्यंत खडतर रस्ते केले विकासाच काम अर्धवट सोडुन ठेकेदार गायब झाला आहे काही दिवस रसत्याच्या बाजुला रस्ता बांधकामाचे टँक्टर ट्रक टँकर रोडरोलर जेसिबी असे वाहन उभे होते तारीखपेतारीख सांगुन काम सुरू होईल असे कामावरचे चौकिदार सांगत होते परंतु आता हे सगळे वाहन अचानक गायब झाले असून हे वाहन वेगवेगळ्या ठेकेदारांचे होते सगळ्यांचेच पैसै बाकि राहील्यामुळे मजुरांचे पैसै देऊ न शकल्या मुळे अखेर काम बंद करण्यात आले आणी सर्वसामान वाहन गायब झाली चौकशी केली असता निमकर्दा येथे ठेकेदाराचा मोठा ठिय्या होता पंरतू आता तेथीही कोणी राहील नसल्याचे सांगण्यात येत आहे परराज्यातील मजुरहि परत गेले आहे
अर्धवट काम सोडल्यामुळे भक्तांना शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अत्यंत खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत असहे दोन जिल्हयांना जोडणारा अत्यंत वरदळीचा हा मार्ग आता अत्यंत खराब झाला असुन अकोला पालक मंत्री ना बच्चु कडू यांनी तातडिने लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्रामीण भागातील जनता मागणी करत आहे दिल्लीला मोटर सायकल रँली काढणा-या ना बच्चु कडु यांनी अकोला पारस नागझरी शेगांव अशीही मोटरसायकल रँली काढावी म्हणजे या रसत्यावरील प्रवाशांची दाहकता त्यांना समजेल अशीही मागणी ग्रामीण जनता करत आहे छाया नंदु कुळकर्णी