Home Breaking News वाह क्या बात, या तालुक्यात महिलाराज!

वाह क्या बात, या तालुक्यात महिलाराज!

92
सोळा ग्रामपंचायती पैकी पंधरा ग्रामपंचायतीवर सरपंच
मलकापूर:- दिनांक 10 फेब्रुवारी तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदांची निवड तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली आज संपन्न झालेल्या 16 ग्रामपंचायतींपैकी पंधरा ग्रामपंचायतीवर महिलाराज तर एका जागेवर पुरुष सरपंचपदी विराजमान झाले आहेत त्यात भानगुरा कांता निना नप्ते, उपसरपंच जोस्त्ना किशोर रायपुरे, भाडगणी सरपंच छाया सुनील चोपडे, उपसरपंच गणेश काशिनाथ खोडके, वडोदा सरपंच निकिता विरोचन तायडे, उपसरपंच चंदा मंगेश गोंड, म्हैसवाडी सरपंच मधुकर झेंडू थाटे,उपसरपंच विनोद जगन्नाथ चौधरी,विवरा सरपंच गिताबाई गजानन नाफडे, उपसरपंच मुक्ता तानाजी कडु, तालसवाडा सरपंच शुभांगी विजय कोलते, उपसरपंच अश्विन राजेंद्र साठे, दाताळा सरपंच पुजा प्रसाद पाटील, उपसरपंच अमोल आनंदा शिरसाट, निंबारी सरपंच संगीता तानाजी नेमाडे,  उपसरपंच कल्पना रविंद्रसिंह परमार, वाघोळा सरपंच नलुबाई रामदास लष्करे, उपसरपंच कल्पना रामराव लाहुडकर, वाघुड सरपंच मंदा गजानन तायडे,उपसरपंच लता भागवत घाटे, दसरखेड सरपंच शारदा भास्कर सत्यजित,उपसरपंच रोशन ईश्वरलाल जयस्वाल,चिखली सरपंच सोनाली अर्जुन पारधी, उपसरपंच विलास लहनु बोदडे, खामखेड सरपंच अलका महादेव मुंडे, उपसरपंच नामदेव ओंकार कुयटे, दुधलगांव सरपंच अंजली यशवंत पाटील, उपसरपंच विकास त्र्यंबक पाटील, माकनेर सरपंच आशाबाई तेजराव वनारे, उपसरपंच दादाराव वसंतराव वनारे, पिंपळखुटा सरपंच निर्मला गोपाळ उमाळे,उपसरपंच प्रभाकर नामदेव मालठाणे आदींची निवड झाली आहे तर तालुक्यातील एकूण 33 ग्रामपंचायत पैकी  पंचवीस ग्रामपंचायतीवर महिला राज असून सात ग्रामपंचायती वर पुरुष सरपंच आहेत, ग्राम वरखेड येथील सरपंच पद रिक्त असुन तालुक्यात 33 ग्रा.प.पैकी तेरा महिला उपसरपंचपदी विराजमान झाल्या असून विस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पुरुष विराजमान झाले आहे तालुक्यातील 33 पैकी एकंदरीत पंचवीस ग्रामपंचायतीवर महिला राज आले आहे.