Home Breaking News श्री क्षेत्र केदार गावकऱ्यांचा असाही आदर्श पायंडा!

श्री क्षेत्र केदार गावकऱ्यांचा असाही आदर्श पायंडा!

79

नांदुरा : तालुक्यातील श्री क्षेत्र केदार या गावी श्री गजानन महाराज संस्थांन व समस्त गावकरी मंडळी यांनी पुढाकार घेत एक अनोखा समाजपयोगी उपक्रम चालू केला आहे. मुरलीधर राऊत यांचा आदर्श घेवून गरीब गरजू लोकांच्या किंवा आत्महत्या ग्रस्त शेतकर्यांच्या मुलींचे संस्थान मार्फत (मोफत ) लग्न लावणे तसेच बाल संस्कार केंद्र, गुरांसाठी पाण्याचे हौद शाळेसाठी स्मार्ट टी .व्हि . संच, वृक्ष लागवड व संवर्धन थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतीथी, व्यसनमुक्ती प्रचार, हरीनाम सप्ताह , अशा विविध उपक्रमाचा उद्घाटन सोहळा ९ फेबुवारी रोजी श्री गजानन महाराज संस्थान श्री क्षेत्र केदार येथे संपन्न झाला
दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणुन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुरलीधर भाऊ राऊत( हाँटेल मराठा) सामाजीक कार्यकर्ते शेळद ता . बाळापुर हे होते .सोबतच पूणे येथील उध्योजक , समाजसेवक ‘ दानशुर श्री उल्हासराव पठाडे . तहसीलदार राहूल तायडे यांच्या वतीने श्री बंगाले साहेब व म्हस्के साहेब . तसेच आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रशीक्षक श्री रमेश काका फुंडकर . श्री भगवानभाऊ धांडे प . स . सदस्य . अॅड श्री अतुल पाटील . ओम साई फाउंडेशन चे अध्यक्ष श्री विलास निंबोळकर . ह . भ. प . श्री मनोज महाराज (श्री गुरुदेव सेवाश्रम नांदुरा ). ह भ . प . श्री निंबोळकार महाराज नांदूरा . डॉ मनोज डोफे डॉ श्री संजय इंगळे दहीगांव . सरपंच श्री ज्ञानेश्वर ढोले . मदनजी खडे . श्री विश्वंबरजी मुंढे पारस . श्री केशव मापारी मा . सभापती . श्री अंधुरे काका ( निर्सगप्रमी ) नांदुरा . अन्नदाते श्री मधुकरजी बाठे धाडी . व संस्थाचे कार्यकर्ते पंचक्रोशीतील व गावातील मंडळी उपस्थीत होते . कार्यक्रमाचे संचलन शाम रोठे व प्रस्तावीक ह .भ. प . श्री संतोषजी महाराज टिकार यांनी केले व मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले .श्री उल्हासराव पठाडे यांनी रोख ५१ ० ० ० रु . चा निधी या कामासाठी समर्पीत केला व दूरवेसन सोडणार्यां व्यकींना प्रती व्यक्ती ५०० रु . बक्षीस दिले तसेच गावातील चिमुकल्यांनी रस्त्यावरचे गडडे बुजण्याचे काम केल्या बद्दल प्रोत्साहित म्हणुन २१00 रु बक्षीस दिले . व या उपक्रमांना दिशा देणारे ज्ञानेश्वरजी पठाडे यांनी आभार प्रदर्शन केले व महाप्रसाद घेवून कार्यक्रमांची सांगता झाली .