Home क्राईम न.प.उपाध्यक्ष,नगरसेवकासह अटकेत असलेल्या सहा जणांना जामीन

न.प.उपाध्यक्ष,नगरसेवकासह अटकेत असलेल्या सहा जणांना जामीन

149
वाढदिवसाच्या कार्यक्रमात तलवारीचा नंगानाच केल्याप्रकरण
मलकापूर:- शहरातील पारपेठ भागात नगरपालिकेचे उपाध्यक्ष हाजी रशिदखाॅ जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात युवकांनी तलवार घेऊन नाचण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने पो. कॉ. शेख आसीफ शेख गफ्फार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डि.बी.पथकाने न.प.उपाध्यक्ष रशिदखाॅ जमादार, नगरसेवक जावेद कुरेशी सह मो.शोयब मो.अहमद, जावेद खान इस्माईल खान, मो. फैजुर रहेमान मो. सैफुरहेमान, शेख ईमाम शेख आजम अश्या एकुण सहा जणांना अटक केली असुन यांच्या कडुन दहा हजार रुपयांच्या पाच तलवारी जप्त केल्या होत्या चार दिवसांच्या पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता ॲड.हरीश शहा, ॲड.नितिन जाधव यांनी केलेल्या युक्तिवादाने सर्वांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत ठाकुर करीत आहे.