Home Breaking News आज वसंतपंचमी जाणूया, काय विशेेष !

आज वसंतपंचमी जाणूया, काय विशेेष !

76

वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे.

भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता – सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते.

हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे.  या दिवशी ‘सुवसंतक’ नावाचा उत्सव होत असे.वसंत पंचमीचा कृषी संस्कृतीशी संबंध दिसून येतो. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात. हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणपती, इंद्र, शिव आणि सूर्य यांची प्रार्थनाही होते. बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत प्रभातफेरी काढतात.

 

पंचमीच्या तारखा :

सन २०२२ – ४ फेब्रुवारी
सन २०२१ – १६ फेब्रुवारी
सन २०२० – ३० जानेवारी, ३१ जानेवारी
सन २०१९ – फेब्रुवारी १०
सन २०१८ – जानेवारी २२

खामगाव येथे मंदिर

खामगाव येथे घाटपुरी नाका भागात श्री सरस्वती मंदिर आहे. येथील प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक चंद्रशेखर मोहता यांनी या मंदिराची निर्मिती केली असून वसंत पंचमी निमित्ताने धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.