शेगाव: आज दिनांक 16 /2/2021रोजी शेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी च्या वतीने आज गॅस व डिझेल, पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये महिला प्रदेश सचिव नंदाताई पाऊलझगडे व शेगाव महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चुलीवर स्वयंपाक करून केंद्र सरकारचा निषेधकरण्यात आला. तसेच वाढलेली महागाई कमी करण्यात यावी यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळेस नंदाताई पाऊलझगडे महिला प्रदेश सचिव, संगीतरावजी भोंगळ,सहकार नेते पांडुरंग दादा पाटील, विनोद भाऊ साळुंके जिल्हा उपाध्यक्ष शहराध्यक्ष, मनोज शर्मा, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष भूषण दाभाडे महिला शहराध्यक्ष अलकाताई बांगर, सेवादल शहराध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ ताकोते, अल्पसंख्याक अध्यक्ष अन्सार खान, ओबीसी शहराध्यक्ष श्रीधर गायकवाड, यांच्यासह महिला कार्यकर्त्या खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
