पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल शेगाव तालुका सरपंच संघटनेचे वतीने सत्कार
शेगाव : अ भा श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा चांदुरबिस्वा अंतर्गत आचार्य बाळशास्री जांभेकर स्मृती पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल प्रेस क्लब चे अध्यक्ष तथा लोकमत चे पत्रकार अनिल उंबरकार यांचा शेगाव तालुका सरपंच संघटनेच्या वतीने सत्कार सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर थारकर, नितिन बारहाते,श्री मोंगळ जानोरी,समाधान खंडेराव कालखेड, देशोन्नतीचे पत्रकार अमर बोरसे,इंडिया वन न्युज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी राजवर्धन शेगावकर उपस्थित होते.
