बुलडाणा: कोरोना संसर्ग स्थिती पाहता प्रशासनाने निर्बंध कायम ठेवले असले तरी सर्व आस्थापनांना परवानगी पण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत परवानगी दिली आहे. त्यामुळे सध्या थोडा दिलासा मिळाला आहे, नागरिकांनी नियम पाळले तर ही परिस्थिती आणखी बदलू शकते.
उद्या सोमवार 1 मार्च रोजी सकाळी संपणारा लॉकडाऊन आता एका आठवड्यासाठी वाढविण्यात आला आहे. त्यांनुसार बुलडाणा जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र त्यानंतर संचारबंदी असणार आहे. मास्क वापरणे, हात धुणे तसेच सॅनिटाईझरचा वापर बंधनकारक राहील.
■ दूध विक्रेत्यांना पूर्वीप्रमाणेच सूट राहील.
■ विशेष म्हणजे मॉर्निंग वॉक आणि व्यायामाला परवानगी राहील.
■ अंत्यसंस्काराला केवळ 20 ची तर विवाहाला 25 जणांची अनुमती राहील
■ हॉस्पिटल, मेडिकल 24 तास सुरू राहतील
■ वाहतुकीचे नियम पूर्वीप्रमाणेच राहतील
■ सर्व शाळा, कोचिंग क्लास, महाविद्यालय बंद राहतील
■ हॉटेल, रेस्टॉरंटला 50 टक्के क्षमतेसह दिवसभर परवानगी..संध्याकाळी पार्सल सुविधा देता येईल.
