खामगाव- ग्रामीण आणि शहरी भागातील तपासण्या वाढविण्यात आल्या असून रविवारी रात्री 12 वाजताच्या आकडेवारी नुसार बुलडाणा जिल्ह्यात 118 रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाने जिल्ह्यात कहर सुरू केला असून पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागून केली असून शनिवारी व रविवारी कडकडीत बंद ठेवला जाणार आहे. दरम्यान आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असून शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांचे नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले जात आहे.
जोवर कोरोनावर इलाज सापडत नाही तोपर्यंत नागरिकांना खबरदारीने वागण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे, कोरोनाची लस सुद्धा उपलब्ध झाली असून काही दिवसांनी खाजगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये लस येईल असे सांगितले जात आहे. तोवर नागरिकांना संयम ठेवावा लागेल. त्यासाठी जे नियम आहेत ते पाळावे लागणार आहेत. त्यात प्रामुख्याने मास्कचा वापर, गर्दी टाळणे, नियमितपणे हात धुणे असे साधे सोपे उपाय आहेत. कोरोनाने घाबरून जायचे नाही मात्र जबाबदारीने वागणे मात्र अत्यावश्यक आहे. असे आहेत आजचे रुग्ण 118 आहेत.
आज बुलढाणा जिल्ह्यात तब्बल
110 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
▪️बुलडाणा: 25 ▪️खामगाव: 19
▪️शेगाव : 13 ▪️दे. राजा : 06
▪️चिखली : 05 ▪️मेहकर : 95
▪️मलकापूर: 24▪️नांदुरा : 00
▪️लोणार : 03▪️मोताळा : 01
▪️सि. राजा : 09 ▪️जळगाव जा.: 04
▪️संग्रामपूर : 00▪️लाखनवाडा 00
या हॉस्पिटलमध्ये मिळेल लस
१)सिल्व्हर सिटी हॉस्पिटल खामगाव
२) सोनटक्के चिल्ड्रेन हॉस्पिटल खामगाव
३)माऊली हॉस्पिटल शेगाव
४) सिटी हॉस्पिटल बुलडाणा
५)अमृत हृदयालय बुलडाणा
६)संचेती हृदयालय बुलडाणा
७)मेहेत्रे हॉस्पिटल बुलडाणा
८) मानस हॉस्पिटल
९)कोलते हॉस्पिटल, मलकापूर
१०) आस्था हॉस्पिटल
११)चोपडे हॉस्पिटल, मलकापूर
१२) कोठारी हॉस्पिटल चिखली
१३)तुळजाई हॉस्पिटल चिखली
१४)राठोड हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी मेहकर
१५)मेहकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
वरील खासगी हॉस्पिटलमध्ये लवकरच नागरिकांसाठी कोरोनाची लस 250 रुपयात तर सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत लसीकरण होणार आहे.
