Home Breaking News आज 690 कोरोनाने बाधीत; ‘हा’ तालुका टॉपवर

आज 690 कोरोनाने बाधीत; ‘हा’ तालुका टॉपवर

141

बुलडाणा: जिल्ह्यामध्ये आज 690 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत
15 मार्च काल रात्री 12 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 690 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.विशेष म्हणजे एकट्या बुलडाणा तालुक्यातील रुग्ण संख्या 146 आहे.

कोरोनाने जिल्ह्यात कहर सुरू केला असून पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असून शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांचे नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले जात आहे. त्यामुळे रूग्ण संख्य वाढत आहे दुसरीकडे लसीकरण सुद्धा सुरू आहे. तर 23 मार्च पर्यत लॉकडाऊन वाढवून देण्यात आले आहे.

गत 24 तासात बुलडाणा जिल्ह्यात
690 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

▪️बुलडाणा: 146 ▪️खामगाव: 79
▪️शेगाव : 86 ▪️दे. राजा : 41
▪️चिखली : 131▪️मेहकर : 14
▪️मलकापूर: 61▪️नांदुरा : 47
▪️लोणार : 09▪️मोताळा : 36
▪️सि. राजा : 33 ▪️जळगाव जा.: 05
▪️संग्रामपूर : 02

एकूण टेस्ट: 5108
पॉझिटिव्ह : 690
निगेटिव्ह : 4402