कोरोनाचा लॉंग ‘मार्च’ : रुग्ण दोन हजारांवर
बुलडाणा : जिल्ह्यामध्ये आज 735 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर खामगाव शहरातील रुग्ण जास्त आहेत.
27 मार्च काल रात्री 12 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 735 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.
कोरोनाने जिल्ह्यात कहर सुरू केला असून पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असून शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांचे नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले जात आहे. त्यामुळे रूग्ण संख्य वाढत आहे दुसरीकडे लसीकरण सुद्धा सुरू आहे.
असे आहेत तालुकानिहाय रुग्ण
▪️बुलडाणा: 94 ▪️खामगाव: 125
▪️शेगाव : 58 ▪️दे. राजा : 46
▪️चिखली : 99▪️मेहकर : 25
▪️मलकापूर: 90▪️नांदुरा : 28
▪️लोणार : 20▪️मोताळा : 39
▪️सि. राजा : 86 ▪️जळगाव जा.: 25
मार्च महिन्यात खामगाव 2 हजार पार
खामगाव शहरात कोरोना बाधितांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. मार्च महिन्यात खामगावच्या कोरोना बाधितांचा आकडा २०००च्या पार गेला आहे.
