Home Breaking News प्रवाशी घेवून जाण्याच्‍या कारणावरुन ऑटो चालकाचा मर्डर

प्रवाशी घेवून जाण्याच्‍या कारणावरुन ऑटो चालकाचा मर्डर

85

 

खामगाव – प्रवाशी घेवून जाण्याच्‍या कारणावरुन ऑटो चालकांमध्ये वाद होवून एकाने दुसऱ्या ऑटो चालकाच्‍या पोटात धारधार चाकूने भोसकून खून केल्‍याची घटना आज दि.१ एप्रिल रोजी निर्मल टर्निग जवळ सायंकाळी ६ वाजता घडली. सदर घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निर्मल टर्निंग जवळील ऑटो स्‍टॉप वर मेहरसिंग गोविंदसिंग चव्‍हाण (४३) व अजय विनायक आवटे (४०) दोघे रा.सती फैल या दोघांमध्ये सायंकाळी प्रवाशी घेवून जाण्याच्‍या कारणावरुन वाद झाला. सदर वाद इतर ऑटो चालकांनी निवळला. परंतु, काही वेळानंतर उपरोक्‍त दोघांमध्ये पुन्‍हा वाद उफाळून आला व ‍मेहरसिंग चव्‍हाण याने त्‍याच्‍या जवळील धारधार चाकूने अजय आवटे याच्‍या पोटामध्ये वार केला. यावेळी अजय आवटे हा रक्‍ताच्‍या थारोळ्यात जमीनीवर कोसळला. दरम्‍यान आरोपी मेहरसिंग चव्‍हाण यानेच अजय आवटे यास स्‍वतःच्‍या ऑटोमध्येच टाकून तातडीने उपचारार्थ येथील सामान्‍य रुग्‍णालयामध्ये दाखल केले. दरम्यान डाॅक्‍टरांनी त्‍याची तपासणी करुन मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल हुड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्‍थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून सामान्‍य रुग्‍णालय येथून पोलिसांनी आरोपी मेहरसिंग चव्‍हाण यास रुग्‍णालय आवारातून ताब्‍यात घेतले. वृत्‍त लिहेपर्यंत पोलीसांची गुन्‍हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.
दरम्यान सती फैलसह परिसरातील नागरिकांनी सामान्य रूग्णालय व निर्मल टर्निंग परिसरात मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.