खामगाव – होम डिलिव्हरी देण्यासाठी निघालेला विक्रेता माणूस वाटेतच मद्य अर्थात देशी दारू विकत होता, ही माहिती मिळताच भाजपा नगरसेवकाने त्यास पकडले व पोलिसाच्या ताब्यात दिले. आज घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दारू मिळते आता दिवसभर

मद्य , देशी मद्य ,सौम्य बिअर आणि वाइन सकाळी सात ते रात्री आठपर्यंत सीलबंद बाटलीतून घरपोच विकण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र दूध किराणा भाजीपाला या जीवनावश्यक वस्तू मात्र सकाळी सात ते अकरा पर्यंत विकण्यासाठी परवानगी दिलेली आहे. याचा अर्थ जीवनावश्यक खाद्यपदार्थ दूध यापेक्षाही मद्यविक्री ही अधिक जीवनावश्यक असल्याचे राज्य सरकारला वाटत असावे. त्यामुळे मध्य विक्रीतून मिळणारा महसूल सोडण्यास राज्य सरकार सध्यातरी तयार नसल्याचे चित्र आहे. या साऱ्या बाबतचे राजकारण आणि पैशांची देव-घेव याबाबत माहिती घेतली असता सर्वच बियर बार आणि रेस्टॉरंट धारक ज्यादा किंमत लावून सध्या किरकोळ मध्ये विकत असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी 21 एप्रिल रोजी विक्रीबाबत नवीन आदेश काढला असून तीस तारखेपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आम्हाला कोणी हात लावू शकत नाही. कारण आमच्या हप्ता योग्य त्या यंत्रणेद्वारे वरिष्ठांना पोहोच झाला आहे, असेही एका मद्य विक्रेत्यांनी छातीठोकपणे सांगितले. दरम्यान आज शहरात भाजपा नगरसेवकाने एका दारू विक्री करणाऱ्या माणसाला पकडलं व त्यांचा व्हिडीओ वायरल केला. दरम्यान आ. आकाश फुंडकर यांनी सुद्धा ट्वीट करत या प्रकरणी सरकारवर सडकून टीका केली आहे.

अवैध दारू विक्रीमुळे कोरोना वाढत नसून नियम मोडून दारू विक्री करणाऱ्या संबंधित दुकानदराचा परवाना रद्द करावा अशी मागणीही भाजपा नगरसेवक राकेश राणा यांनी केली आहे.
पहा व्हिडिओ….
