Home Breaking News निष्ठावंत काँग्रेसी वा-यावर,नवे अपवाद सोडले तर बुलडाणा काँगेसमध्ये गुळाचे गणपती!

निष्ठावंत काँग्रेसी वा-यावर,नवे अपवाद सोडले तर बुलडाणा काँगेसमध्ये गुळाचे गणपती!

82

 

जिल्हा प्रतिनिधी

बुलढाणा : देशाच्या स्वातंत्र लढयात महत्वाची भूमिका बजावणा-या काँग्रेस पक्षाची कधी न झाली इतकी राजकिय दैनावस्था मागील काही वर्षाच्या कालखंडात बघायला मिळाली. अंतर्गत गटबाजीने पोखरलेल्या बुलढाणा जिल्हयातील काँग्रेसला तारण्याचे कार्य जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकुल वासनिकांना करावे लागेल, असे बोलले जात होते. मात्र, वासनिकांची जादूही आता कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. मोठया प्रमाणात ग्रामीण भागात विखुरलेला निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता पक्षात अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या तथाकथित उच्च पदाधिका-यांच्या पिळवणुकीचा बळी ठरत असतानाचं पुन्हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने तेच ते चेहरे निष्ठावंत काँग्रेसजणांच्या गळयात बांधल्याने बुलढाणा जिल्हयातील घाटावरील व घाटाखालील काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या विरोधात थेट दिल्ली-मुंबईपर्यंत काँग्रेसमधीलचं काही वरिष्ठ नेते जावून आले. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काहीतरी होणार? अशी अपेक्षा बाळगून अनेकजण पाण्यात देव घालुन बसलेही होते. पटोले यांनी बुलढाणा जिल्हयाचा दौरा करून अनेकांची मते जाणून घेतली. त्यानंतर मुकुल वासनिक ही जिल्हयात येवून गेले त्यांच्या दौ-यानंतर अनेकांच्या अपेक्षाही उंचावल्या होत्या. मात्र काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावर पुन्हा राहुल बोंद्रे यांची निवड करण्यात आल्याने ही निवड काँग्रेसला पुन्हा गर्तेत ढकलण्यासाठीतर नाही ना? असा सूर काँग्रेसजणांमधून उमटत आहे. जयश्रीताई शेळके, धनंजय देशमुख आणि इतर नव्या चेह-यांना संधी मिळाल्याचा एकीकडे आनंद असतानाचं दुसरीकडे कैक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्यांना यावेळी थांबवून नव्या चेह-यांना संधी दयायला हवी होती. असे काही नाराज कार्यकत्र्यार्ंचे म्हणणे आहे. तेच ते चेहरे काँग्रेसच्या कार्यकारिणीत बसल्याने विरोधकांना आगामी काळात येणा-या निवडणुका जिंकण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचीही भावना व्यक्त होत आहे. राहुल बोंद्रे यांची पुन्हा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदावर निवड करतांना त्यांच्या एैवजी अन्य कोणीचं काँग्रेसी नेता या पदासाठी योग्य नसल्याचा स्पष्ट निर्वाळा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला असल्याने पुन्हा एकदा वर्चस्वाचे राजकारण काँग्रेसमध्ये बघायला मिळत आहे जे येणा-या काळात काँग्रेसला बळकटी देण्याएैवजी आणखी गर्तेत ढकलण्यासाठी पूरक ठरू शकते, यात तिळमात्र शंका नाही.काही नवीन चेहरे सोडले तर हवा नसलेल्या फुगे काँगेसत कमिटीमध्ये भरण्यात आले आहेत अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे. तर गणेशराव पाटील सारखे अनेक लोकांना मुकुल वासनिक यांनी काँग्रेसमध्ये ठेवलं आहे, असे अनेक काँगेस नेते जिल्ह्यात आहेत त्यांना सामान्य माणूस ओळखत नाही, त्यांचे ग्राउंडवर काहिच काम नाही. फक्त गुळाचे गणपती बनलेले आहेत.