Home Breaking News भाड़गणी येथील दोन अपात्र ग्रा.प. सदस्यांना दिलासा; जिल्हाधिकारी आदेशाला उच्च न्यायालयायची स्तगिती...

भाड़गणी येथील दोन अपात्र ग्रा.प. सदस्यांना दिलासा; जिल्हाधिकारी आदेशाला उच्च न्यायालयायची स्तगिती !

150

मलकापूर : निवडणूक ख़र्च विहित कालावधीत सादर न केल्याचे कारण पुढे करून भाडगणी त येथील दोन ग्रामपंचायत सदस्य जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी अपात्र घोषित करण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्तगीति दिली आहे.
सविस्तर असे की भाड़गनी ता मलकापुर येथील सार्वत्रिक निवडणूक 18 जानेवारी 2021 ला झाली त्यात इंदूबाई अशोक खोड़के आणि शीतल विजय गोरे हे सदस्य म्हणून निवडून आलेत त्यानी 30 दिवसांचे आत त्यानी निवडून आलेल्या पदाचा निवडणूक खर्च सादर केला होता पर्यन्तु जिल्हाधिकारी यांनी अपात्रता आदेश पारित करन्यापूर्वी आवश्यक असलेली कारने दाखवा नोटिस सदर सदश्याना न देता एकतरफी अपात्रता आदेश पारित केले. सदर कलमा नुसार वेळेत खर्च दाखल का करू शकले नाही त्यासाठी योग्य व समाधान कारक कारण होते का हे पाहने आवश्यक असते आणि त्या करिता कारने दाखवा नोटिस काढून बाजू मांडण्याची संधी देणे आवश्यक होते , तसे न झाल्याने सादर केलेला खर्च जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात आणण्याची संधी सदर उमेदवाराना मिळाली नाही.असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. त्यावरून न्यायालयाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे सदर स्तगिती आदेशा मुळे सदर सदश्याना दिलासा मिळाला , याचिकाकर्ता च्या वतीने अँड प्रदीप क्षीरसागर यांनी काम पाहिले.