Home नागपूर संपादकाच्या लेखणीतून उलगडले ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग …गोर गरिबांचे “माय-बाप” नाना!

संपादकाच्या लेखणीतून उलगडले ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग …गोर गरिबांचे “माय-बाप” नाना!

93

देव भेटले….! देव बोलले….!!

@गोविंद अंबुसकार, संपादक मातृभाषा

आपण गर्दीत असतो तेव्हा देवाकडे डोळे उघडे ठेवुन बघतो.पण,”देव” समोर असला की आपण डोळे बंद करुन देवाला हात जोडतो.
कदाचित इथेचं देव समजुन घेतांना गडबड होत असावी…मात्र,आज आईने देव भेटल्याचे चैतन्यभाव व्यक्त करत देव बोलल्याचे समाधान मानले…..!
आईला कर्करोग असल्याचे निदान कडक लाॕकडाऊन असतांना झाले. कोरोना संक्रमणामुळे अख्ख विश्वचं ठप्प होतं…त्या प्रतिकुल परिस्थितीत मनाची घालमेल सुरु असतांना उपचारासाठी आर्थिक तडजोड कशी करावी हा यक्ष प्रश्न डोळ्यांसमोर अंधार वाढविणारा होता…,तेव्हा नानांना फोन करुन सर्व परिस्थिती सांगितली त्यानंतर त्यांनी वेळो-वेळो त्यांच्या माध्यमातून जे-जे शक्य होईल ते सगळं सहकार्य केलं…..


वेळो-वेळी फोन करुन आईच्या तब्येतीची विचारपुस केली. निरंतर मदत-सहकार्य करत आहेत….!
अकोला येथे कर्करोगाची उपचार पध्दती केमोथेरपी सुरु असतांना शरिर थकले त्यात अचानक डाव्या हातावर सुज आली अन् हात ठणकू लागला आता हा कुठला नविन आजार म्हणुन वैद्यकीय तज्ञाच्या मार्गदर्शनात आवश्यक तपासण्या केल्यात तर निदान आले रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठले त्यामुळे शस्त्रक्रिया करुन त्या रक्ताच्या गाठी काढाव्या लागतील. त्या शस्त्रक्रियेचा खर्च सद्यातरी झेपवणारा नव्हता….!
आणि शस्त्रक्रिया टाळता सुध्दा येत नव्हती त्यात केमोथेरपी सुध्दा थांबविण्यात आली.
मात्र, वै.पुरुषोत्तम हरी[गणेश] पाटिल चॕरिटेबल ट्रस्ट,च्या माध्यमातून श्री.ज्ञानेश्वरदादा उपाख्य नानासाहेब पाटिल यांनी गोर-गरिब,कष्टकरी रुग्णांकरिता “जिवनसंजीवनी” उपलब्ध करुन दिली.
४ दिवसापुर्वी आईला माऊली डायलीसीस अॕण्ड हार्ट केअर सेंटर येथे भरती केले. त्याच दिवशी पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर परत दुसर्या दिवशी पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. डाॕ.श्री.अंबरिशजी खटोड सरांनी दुर्धरआजारग्रस्त असलेल्या माझ्या आईला तिच्या क्षतीग्रस्त शारिरिक क्षमतेचा विचार करुन २ शस्त्रक्रिया यशस्वी केल्यात.
शस्त्रक्रियेपुर्वी नानांनी वैद्यकीय टिम सोबत चर्चा केली होती.
मागिल १ वर्षापासुन नानासाहेब सातत्याने माझ्याशी बोलतांना आईच्या तब्येती विषयी विचारपुस करत होते. व वेळो-वेळी उपचारासाठी सहकार्य करुन मला व कुटुंबाला धिर देत आहेत…


आज आईला सुट्टी मिळण्यापुर्वी नानांनी आईची आस्थेने विचारपुस केली. अकोला येथील डाॕक्टरांशी फोन वर संवाद साधला. आणखी काही अडचण असल्यास बिनदिक्कत मला सांगा आपण जे-जे शक्य असेल ते सर्व करुन असा भावनिक धिर देत. आईंशी तब्येतीबद्दल विचारपुस केली तेव्हा आई म्हणाली तुम्ही देव माणसं आहात तुमच्या मुळेच आम्ही जिवंत आहोत मला तुमच्या पाया पडु द्या…
भाऊ, गोईंदा तुमच्या बद्दल नेहमी सांगते… तुमचे खुप उपकार आहेत….
आईचे व्याधीग्रस्त शरिर वेदनांचा कल्लोळ असतांना नाना समोर उभे असल्याचे प्रमाण म्हणुन आईच्या चेहर्यांवरचे भाव चैतन्य निर्माण करणारे होते…..
कदाचित देव भेटल्यावर देव बोलल्यावर भक्तांच्या अंतकरणाला मिळणारे समाधान हेच असावे!!!
एखाद्या कष्टकरी कुटुंबातील व्यक्ती जेव्हा दुर्धरआजाराने ग्रस्त होते तेव्हा त्या कुटुंबातील सदस्यांच्या मनस्थितीला धिर हवा असतो. व ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपुष्टात येते अशा सर्व गोष्टींचा विचार करुन गोर-गरीब रुग्णांची सेवा घडावी हा उद्देश ठेवुन “माऊली हाॕस्पिटल” उभारल्या चे नानांनी अनेकदा सांगितले मात्र, त्या करिता संवेदनशील मन असावं लागत.वैद्यकीय क्षेत्रात सद्या असा सेवाभाव दुर्मिळ होत असतांना “माय-बाप” नाना!
अशी भावना व्यक्त होतांना दिसुन येते.
अशा परिस्थितीची जाणीव होवुन रुग्णांना “जिवनसंजीवनी” सह धिर देणारे हात देवाचेचं असु शकतात….!
माणसांमध्ये सुध्दा देव असतो देव ओळखता यायला हवा नाहीतर देव समोर असतांना डोळे मिटुन हात जोडले तर कदाचित देव अनुभवता येणार नाही
असा समज आईचा असावा तिला आज देव भेटल्याचे व देव बोलल्याचे समाधान वाटले….!