Home Breaking News अवैध धंदेवाल्यांचे पोलिसांशी सूत; सोनाळा परिसरात अवैध धंद्यांना ऊत !

अवैध धंदेवाल्यांचे पोलिसांशी सूत; सोनाळा परिसरात अवैध धंद्यांना ऊत !

124
?? सोनाळा टूनकी बनले अवैध धंद्याचे केंद्र       
?? दादागिरी करत  गांजा व दारूविक्री 
?? गुन्हेगारांना पोलिसांचे अभय
??मुख्य सूत्रधारांना पोलीस पकडणार तरी कधी?
विठ्ठल निबोळकार 
संग्रामपूर : अवैध देशी कट्टे, गांजा यांची विक्री यासाठी कुप्रसिद्ध असलेला सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीतील टुनकी व त्या सहभोवती परिसरात अवैध देशी दारू विक्रीचे केंद्र बनला आहे. शेतकरी कुटुंबातील युवा पिढी दारूच्या आहारी जात असल्याने अनेक संसार उघड्यावर येत आहेत दुसरीकडे अवैध दारु विक्री करणारे व्यवसायिक मस्तवाल बनले असून दादागिरीच्या भरोशावर खुलेआम अवैध दारू विक्री करून माया गोळा करत आहेत.
बुलडाणा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध देशी दारूची विक्री हे सर्रास होत आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे तरुण मुले  हे व्यसनाधीन झालेले आहेत. या तरुणांचे भविष्य हे धोक्यात आलेले आहे, तरीसुद्धा शासनाचे आणि प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसतेय. सरकार फक्त टॅक्स स्वरूपात आपली तिजोरी कशी भरेल, याकडे लक्ष देत आहे. परंतु आमच्या शेतकऱ्यांची पोर हे व्यसनाधीन होत आहेत याकडे मात्र  दुर्लक्ष होत आहे.
पोलिसांनी अर्थपूर्ण संबंध असल्याने दोन व्यवसायी अवैध व्यावसायिकांना जणू अवैद्य दारू वाहतुकीचा अलिखित परवानाच दिलेला आहे पोलिसांची डोळेझाक होत असल्याने अवैद्य दारू माफियांचे मनोबल चांगलेच वाढले असून जो कोणी त्यांच्या धंदा बद्दल आवाज उठवेल त्याला धमक्या देऊन मुस्कटदाबी केला जात आहे बुलढाणा जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेले कर्तव्यदक्ष अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवन कुमार  दत्त यांनी या प्रकरणात लक्ष देऊन अवैध दारू व्यवसायिकांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी परिसरातील सुज्ञ नागरिक ,विविध महिला संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
अवैध दारूची दळणवळण सुद्धा खुलेआम होत आहे. शासनाने याच्यावर तात्काळ कारवाई केली नाही तर, स्वाभिमानी शेतकरी संघटना येणाऱ्या काळामध्ये हा मुद्दा स्वतः हाती घेऊन यावरती खूप मोठे जनआंदोलन उभारले जाई
 – अनंता मानकर 
युवा जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना